करीनाच्या दुसऱ्या मुलाच्या नावावरुन गोंधळ, अखेर सैफच्या बहिणीने सोडलं मौन

अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा आई-बाबा झाले.

Updated: Aug 11, 2021, 08:15 AM IST
करीनाच्या दुसऱ्या मुलाच्या नावावरुन गोंधळ, अखेर सैफच्या बहिणीने सोडलं मौन title=

मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा आई-बाबा झाले. त्याच वेळी, सैफिना तैमूर सोबतच तिच्या लहान  मुलाला घेऊन खूप प्रोटेक्टीव्ह असल्याचं दिसून येत आहे. तिने अद्याप आपल्या मुलाचा चेहरा दाखवला रिवील केलेला नाही.

पण छोट्या नवाबबाबत देखील  सगळ्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. त्याच्या नावाची चर्चा खूप पूर्वीपासून सुरू झाली होती. यानंतर आजोबा रणधीर कपूर यांनी सैफ-करीनाच्या मुलाचे नाव जेह  असल्याचे सांगितले होते.

करीनाच्या गरोदरपणाशी संबंधित पुस्तकात हे उघड झाले आहे की तिच्या मुलाचे नाव जहांगीर अली खान आहे. यामुळे सोशल मीडियावर प्रचंड गोंधळ उडाला आहे.  त्याचबरोबर आता करीनाची वहिनी सबा अली खानने पोस्टद्वारे यावर एक अप्रतिम उत्तर दिले आहे.

सैफच्या बहिणीचा लोकांना संदेश

वास्तविक, अलीकडेच सबा अली खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या कथेतील एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सैफ-करीनाचा मुलगा जहांगीरच्या  नावाने लिहिले- 'जेह ... जान .. नावात काय आहे? प्रेम करा, जगा आणि जगू द्या. मुले ही देवाची देणगी असतात. या पोस्टसोबत तिने एक हार्ट इमोजी शेअर केला  आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x