शाहिद कपूरची पत्नी वापरते फुटलेलं घड्याळ जाणून घ्या यामागचं गुपित

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत नेहमीच चर्चेत असते.

Updated: Aug 11, 2021, 09:11 PM IST
शाहिद कपूरची पत्नी वापरते फुटलेलं घड्याळ जाणून घ्या यामागचं गुपित title=

मुंबई : शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत नेहमीच चर्चेत असते. मीरा देखील तिची लाईफस्टाईल लोकांसोबत शेअर करत राहते. त्याचबरोबर मीरा राजपूतचं स्मार्टवॉच काही काळापासून लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. खरं तर तिचं घड्याळ खूपच फुटलं आहे. पण तरीही मीरा कोणताही संकोच न करता हे घड्याळ आहे तसं वापरते. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी याबाबत तिला अनेक प्रश्न विचारले आहेत.

आता मीरा राजपूतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं आहे की, मी हे घड्याळ का फेकत नाही. वास्तविक त्याची बॉडी सकारात्मक आहे, त्याची कमतरता असूनही, ते जसं आहे तसं मला आवडतं.

मीरा पुढे म्हणाली की, घड्याळ कसं काम करत आहे याचा मला फरक पडत नाही, त्याचा बेल्ट बदलणं माझ्यासाठी नवीन दिसतं, म्हणून मी ते फेकून देणार नाही. कृपया या घड्याळाला माझ्याबरोबर राहू द्या कारण ते योग्य काम करत आहे. हे माझ्या हृदयाचे ठोके देखील दाखवतं.

मीरा राजपूतला जेवणाची खूप आवड आहे. तिने सोशल मीडियावर अनेक पोस्टद्वारे ही गोष्ट सांगितली आहे. मीरा राजपूत स्वतःला फिट ठेवण्यासाठी बरीच मेहनत घेते. मीरा आणि शाहिद यांचा विवाह 7 जुलै 2015 रोजी झाला. त्यांना मिशा आणि झैन अशी दोन मुलं आहेत.

शाहिद आणि मीरा अलीकडेच एकत्र दिसले होते
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर अलीकडेच मुंबईत स्पॉट झाला. तो नुकताच त्याच्या चित्रपटाचं शूटिंग संपवून गोव्यातून परतला आहे. यावेळी शाहिदसोबत त्याची पत्नी मीरा राजपूतही उपस्थित होती. मुंबईच्या रस्त्यांवर शाहिदची ही स्टाईल एकदम अनोखी होती. त्याने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता. त्याने या टी-शर्टसोबत ट्विनिंग शॉर्ट्स घातली होती. नेहमीप्रमाणे शाहिद या लूकमध्ये मस्त दिसत होता. शाहिदसोबत त्याची पत्नी मीराचा पोशाखही खूप छान दिसत होता.