मुंबई : सेलिब्रेटी आणि त्यांचे व्यवस्थापक यांच्यातील संबंध मित्र आणि भाऊ-बहिणी यांच्यासारखेच असतात. व्यवस्थापक केवळ कलाकारांची महत्वाची कामेच हाताळत नाहीत तर कधीकधी त्यांना स्टार बनविण्याचे कामही करतात. जितके प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री आहेत तितके त्यांच्या व्यवस्थापकांना त्याहीपेक्षा अधिक काम करावे लागते.
आज आपण करीना कपूर आणि काही वर्षांपासून तिच्या सोबत काम करणाऱ्या पूनम दमानिया बद्दल बोलत आहोत. पूनम करीना कपूरची जवळपास १० वर्षे मॅनेजर होती, परंतु आता करीना कपूर आणि तिची मॅनेजर पूनम यांनी सहमतीने एकमेकांपासून विभक्त होण्याचे ठरविले आहे.
पूनम ही करीना कपूर सोबत रेश्मा शेट्टीची टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी मॅट्रिक्स अंतर्गत जोडली गेली होती. मात्र, आता ती या कंपनीपासून विभक्त झाली आहे. हेच कारण आहे की, ती यापुढे करीना कपूरच्या व्यवस्थापनाची कामे हाताळणार नाही. दरम्यान, अशी बातमी पुढे आली आहे की, पूनम स्वत:ची टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी उघडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पूनम सेलिब्रिटी मॅनेजमेंट एजन्सी क्वानमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे, असे वृत्त मीडिया हाऊसेसचे आहे.
पूनम करीनाचे जवळजवळ सर्वचे कामे पाहत होती. यात एंडोर्समेंट डील, चित्रपटांचे व्यवस्थापन, फोटोशूट्सचे ग्लॅमरस फोटो आणि सैफ आणि तैमूरसमवेत फॅमिली व्हेकेशनचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट करायची. दरम्यान, ती विभक्त होत असली तरी व्यावसायिकदृष्ट्या वेगळे होऊनही करीना आणि पूनमच्या वैयक्तिक नात्यावर परिणाम होणार नाही.