53 व्या वर्षी पाचव्यांदा बाबा झाला करिश्मा कपूरचा Ex नवरा

काय म्हणाली करिश्मा 

53 व्या वर्षी पाचव्यांदा बाबा झाला करिश्मा कपूरचा Ex नवरा

मुंबई : करिश्मा कपूरचा एक्स नवरा संजय कपूर पाचव्यांदा बाबा झाला आहे. संजय कपूरने करिश्माशी घटस्फोट घेतल्यानंतर प्रिया सचदेवशी लग्न केलं. प्रियाने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून संजय कपूर पाचव्यांदा बाबा झाला आहे. 

संजय कपूर आणि प्रियाने आपल्या मुलाचं नाव अगदी हटके ठेवलं आहे. या बाळाचं नाव आहे अजारियस. अद्याप या बाळाचा फोटो कुठेही शेअर करण्यात आलेला नाही. 

करिश्माशी घटस्फोट घेतल्यानंतर संजयने प्रिया सचदेवशी एप्रिल महिन्यात लग्न केलं आहे. प्रियाचं हे दुसरं तर संजय कपूरचं तिसरं लग्न आहे. 

संजय कपूरची पहिली पत्नी डिझाइनर नंदिता मथानी होती. नंदिता आणि संजय कपूरला दोन मुलं असून नंतर करिश्मा आणि संजयला देखील दोन मुलं आहे. 

करिश्माच्या दोन्ही मुलांची नाव समायरा आणि कियान आहेत. करिश्माशी घटस्फोट घेतल्यानंतरही संजयचं आणि तिचं नातं चांगल आहे. दोघं अनेकदा आपल्या मुलांसोबत सुट्या घालवताना दिसले आहेत. 

संजय आणि करिश्माने 2016 मध्ये घटस्फोट घेऊन आपलं 13 वर्षांच नातं संपवलं. असं म्हटलं जातं की, या दोघांच्या नात्यात प्रिया सचदेव हिच्यामुळेच दरी निर्माण झाली. 

करिश्माने आपल्या घटस्फोटाच्यावेळी सांगितलं होतं की, प्रिया त्यांच्या घरी राहते आणि याचमुळे तिला मानसिक त्रास होतो. या कारणामुळे ती घटस्फोट घेत आहे. 

समायरा आणि कियान या दोन्ही मुलांची जबाबदारी करिश्माकडे आहे. पण ही दोन्ही मुलं अनेकदा संजय कपूरसोबत वेळ घालवताना दिसतात. 

या उन्हाळ्याच्या सुट्टीत दोन्ही मुलांसोबत करिश्मा लंडनला गेले आणि नंतर या तिघांसोबत संजय कपूर इटली फिरायला गेले. 42 वर्षांची प्रिया दुसऱ्यांदा आई बनली आहे.  

प्रियाने संजयच्या अगोदर हॉटेल बिझनेस करणाऱ्या विक्रम चटवालसोबत लग्न केलं होतं. विक्रम आणि प्रिया यांची एक मुलगी आहे. 

करिश्मा कपूरबद्दल बोलायचं झालं तर तिचं नाव बिझनेसमन संदीप तोशनीवाल याच्याशी  खूप दिवसांपासून जोडलं जात आहे. संदीपने गेल्यावर्षी आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे. यानंतर आता करिश्मा आणि संदीप लवकरच लग्न करणार आहेत अशी चर्चा आहे.