कार्तिक आर्यन रस्त्यावर लोकांना वाटतोय फुलं, काय आहे प्रकरण?

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Updated: Dec 7, 2021, 08:50 PM IST
कार्तिक आर्यन रस्त्यावर लोकांना वाटतोय फुलं, काय आहे प्रकरण?

मुंबई : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यन सर्वांना थांबवून रस्त्यावर फुलं वाटताना दिसत आहे. हे ऐकून तुम्हाला वाटेल की, या अभिनेत्याला काय झालंय? जर तुम्ही खरंच याचा विचार करायला सुरुवात केली असेल. तर मनाला इतका ताण देऊ नका, आम्ही तुम्हाला यामची सत्यता सांगणार आहोत.

गाण्याचा व्हिडिओ व्हायरल
कार्तिक आर्यनने हे गाणं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिक आर्यन गाण्याचं शूटिंग करत आहे आणि यादरम्यान तो सगळ्यांना थांबवून रस्त्यावर फुलं देत आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, कार्तिक आधी एका मुलीला आणि नंतर दुसऱ्या मुलीला फुलं देतोय.

सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला
हा व्हिडिओ कार्तिक आर्यनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'असं वाटतंय की, कालचीच गोष्ट आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडिओमधील कार्तिक आर्यनची मस्ती तुम्हाला आवडेल
या व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यन मस्तीच्या मूडमध्ये डान्स करताना दिसत आहे. कार्तिक आर्यनसोबत अनेक डान्सर्सही दिसत आहेत. ड्रेसबद्दल बोलायचं झाले तर, कार्तिक आर्यन पांढऱ्यां रंगाचा शर्ट  सोबत पांढऱ्या रंगाचा कोट आणि काळ्या रंगाची पँन्ट परिधान केलीये.