रणबीर कपूरचा वर्तमान आणि भूतकाळ एकत्र, कसं ते पाहा

रणबीर कपूर सध्या आलिया भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.

Updated: Aug 10, 2021, 11:05 PM IST
रणबीर कपूरचा वर्तमान आणि भूतकाळ एकत्र, कसं ते पाहा

मुंबई : रणबीर कपूर सध्या आलिया भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांच्या प्रेमाची चर्चा प्रत्येकाच्या जिभेवर आहे आणि बी-टाऊनमध्ये या जोडीची बरीच चर्चा आहे. पण एक काळ होता जेव्हा रणबीर कतरिना कैफच्या प्रेमात बुडालेला दिसायचा. दोघांचं नातं जवळपास 6 वर्षे टिकले पण नंतर त्यांचे मार्ग का वेगवेगळे झाले ते कळलच नाही. आता विशेष गोष्ट म्हणजे रणबीरची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफ आणि सध्याची गर्लफ्रेंड आलिया भट्ट 'जी ले जरा' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची घोषणा झाली असून त्यांच्या खास बॉण्डिंगचे फोटोही समोर आले आहे.

'जी ले झा'रा मध्ये दिसणार 
जी ले जरा या चित्रपटाच्या घोषणेनंतर यावर बरीच चर्चा झाली आहे. याचं कारण म्हणजे चित्रपटाचा आशय जो अगदी अनोखा आहे. पहिल्यांदाच एक महिला मल्टीस्टारर चित्रपट बनवणार आहे तोही एका रोड ट्रिपवर. हा चित्रपट तीन मुलींची कथा आहे जे एका रोड ट्रिपवर जातात आणि जीवनातील अनुभवातून शिकतात. या चित्रपटात कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि प्रियंका चोप्रा या तीन मुली दिसणार आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रणबीर कपूरने कतरिना कैफसोबत पहिल्यांदा 'अजब प्रेम की गजब कहानी'मध्ये काम केलं आणि ही त्यांच्या प्रेमाची सुरुवात होती. ही गोष्ट आहे 2009 ची. दोघांचं नातं 2009 ते 2015-16 पर्यंत टिकलं पण नंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने सर्वांचच हृद्य तुटलं. कतरिनासोबतच्या ब्रेकअपनंतर काही वर्षांनी, जेव्हा रणबीर आलिया भट्टसोबत एका लग्नात स्पॉट झाला, तेव्हा त्यांना एकत्र पाहिल्यानंतर प्रत्येकजण या नवीन नात्याबद्दल अंदाज बांधू लागले. आणि ते पाहिल्यावर हे स्पष्ट झालं की, दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले आहेत. पण रणबीरबाबत कतरिना आणि आलियामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नाही. अलीकडेच दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्रामवरून एक खास फोटो शेअर केला आहे. ज्यात प्रियांका देखील एकत्र दिसत आहे.