सलमानच्या ईद पार्टीला कतरिना गैरहजर, मोठं कारण समोर...

सलमान खानने ईदच्या दिवशी एक भव्य पार्टी आयोजित केली होती.

Updated: May 4, 2022, 05:19 PM IST
सलमानच्या ईद पार्टीला कतरिना गैरहजर, मोठं कारण समोर... title=

मुंबई : सलमान खानने ईदच्या दिवशी एक भव्य पार्टी आयोजित केली होती. ज्यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. 3 वर्षानंतर सलमानने एवढी मोठी पार्टी दिली. त्याने आपली धाकटी बहीण अर्पिता खानच्या घरी ही पार्टी आयोजित केली होती. पण या पार्टीत तिची खास मैत्रिण कतरिना कैफ दिसली नाही. याआधी ती प्रत्येक वेळी सलमानच्या पार्टीत दिसायची. अशा स्थितीत तिला बोलावलं नाही की ती आली नाही, असा प्रश्न लोकांच्या मनात होता. कतरिना सलमानची बहीण अर्पिताच्याही खूप जवळ आहे. पार्टीत सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, शहनाज गिल आणि इतर अनेक सेलिब्रिटी दिसले.

कतरिनाने अलीकडेच अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केलं आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत ती सलमानच्या खूप जवळ होती हे सर्वांना माहीत आहे. सध्या दोघं टायगर फ्रँचायझीच्या पुढच्या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. हा चित्रपट एप्रिल 2023 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

एका रिपोर्टनुसार, कतरिना अर्पिताची चांगली मैत्रीण होती आणि ती सलमान कुटुंबाच्या खूप जवळ होती. पण आता मात्र कतरिना या कुटुंबापासून दुरावली आहे. त्यामुळेच ती ईद पार्टीत सहभागी झाली नसल्याचं मानलं जात आहे.

दुसर्‍या रिपोर्टनुसार, कतरिना कैफ काही दिवसांसाठी शहराबाहेर आहे. त्यामुळे ती ईद पार्टीला उपस्थित राहू शकली नाही. रिपोर्टनुसार, तिला आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र ती येऊ शकली नाही. ती पती विकी कौशलसोबत दिल्लीत आहे. जिथे ती तिच्या पुढच्या प्रोजेक्टवर काम करत आहे. रिपोर्टनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ एकमेकांसोबत वेळ घालवण्याची एकही संधी सोडू इच्छित नाहीत.