करोडो हृदयांवर राज्य करणारी कतरिना कैफ कधीच शाळेत गेली नाही, जाणून घ्या काय होतं या मागचं कारण

 बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचं नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे.

Updated: Jan 23, 2022, 04:33 PM IST
 करोडो हृदयांवर राज्य करणारी कतरिना कैफ कधीच शाळेत गेली नाही, जाणून घ्या काय होतं या मागचं कारण title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचं नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. लाखो चाहते कतरिनाच्या सौंदर्यावर आणि तिच्या स्टाईलवर फिदा आहेत. पण सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी कतरिना कैफ किती शिकली आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

तुम्ही अनेकदा कतरिना कैफला चित्रपटांमध्ये इंग्रजी बोलताना ऐकलं असेल, जे अनेकांना पटलेही असेल. पण तुम्हाला माहित आहे का की सर्वांच्या मनावर राज्य करणारी कतरिना कधीच शाळेत गेली नाही. खरंतर, तिचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी वंशाचे ब्रिटिश व्यापारी होते, तर आई सुझान ब्रिटिश आहे.

कतरिनाचं शिक्षण
कतरिना कैफचे बालपण जवळपास 18 देशांमध्ये गेलं. कतरिना कैफ सतत प्रवासामुळे शाळेत जाऊ शकली नाही, जरी तिला शिकवण्यासाठी होम ट्यूटर नियुक्त केले गेले. कतरिनाने वयाच्या १४ व्या वर्षी मॉडेल म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. काही वर्षांनी कतरिना मुंबईत आली आणि तिने येथेही आपलं मॉडेलिंग करिअर सुरू ठेवलं. करिअरमध्ये हळूहळू पुढे जात होती. मग काय ती बॉलिवूडची टॉप अभिनेत्री झाली. आणि तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.