गुड न्यूज नाही 'या' कारणामुळं मीडियापासून दूर आहे कतरीना, कारण ऐकून बसेल धक्का

अभिनेत्री कतरिना कैफ कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या पर्सनल लाईफमुळे तर कधी ती तिच्या प्रोफेशनल लाईफमुळेदेखील चर्चेत असते. आता पुन्हा एकदा कतरिना सोशल मीडियावर चर्चेत आली आहे 

Updated: Oct 26, 2023, 11:55 AM IST
गुड न्यूज नाही 'या' कारणामुळं मीडियापासून दूर आहे कतरीना, कारण ऐकून बसेल धक्का title=

Katrina Kaif : अभिनेत्री कतरिना कैफ कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या पर्सनल लाईफमुळे तर कधी ती तिच्या प्रोफेशनल लाईफमुळेदेखील चर्चेत असते. आता पुन्हा एकदा कतरिना सोशल मीडियावर चर्चेत आली आहे आणि यामागचं कारण म्हणजे सध्या अभिनेत्री सोशल लाईफपासून गायब आहे. यावर असंही म्हटलं जातं की कतरिना प्रेग्नंट आहे.

सध्या  कतरिना कैफ  क्वचितच मीडियामध्ये दिसत आहे. विकी कौशलसोबत लग्नानंतर तिने तिचे पब्लिक अपीरियंस खूपच कमी केलं आहे. ज्यामुळे चाहते तिला सोशल मीडियावर अनेकदा प्रश्नही विचारतात.अलीकडेच जेव्हा कतरिना नवरात्रीच्या उत्सवासाठी पोहोचली होती, तेव्हा पुन्हा एकदा तिच्या प्रेग्नन्सीची बातमी व्हायरल झाली होती. मात्र, आता जर अहवालांवर विश्वास ठेवायचा झाला तर, तिच्या सार्वजनिक ठिकाणी कमी दिसण्याचं कारण प्रेग्नंसी किंवा तिचं वैयक्तिक आयुष्य नसून ते कारण अभिनेत्रीच्या प्रोफेशनल आयुष्याशी संबंधित आहे.

याच कारणामुळे कतरिना कैफने तिची सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती कमी केली
बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, कतरिना कैफ लोकांच्या नजरेपासून दूर राहण्याचं कारण तिची प्रेग्नेंसी नसून तिचा 'टायगर 3' चित्रपट आहे, ज्यामध्ये ती पुन्हा एकदा सलमान खानसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे.

जर वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर, निर्मात्यांना 'टायगर 3'बद्दल लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करायची आहे आणि त्यांना lfच्या टायगर 3 ची चर्चा पठाण सारख्या लोकांमध्ये राहण्याची इच्छा आहे. त्यांच्या रिपोर्ट्समध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, कतरिना कैफने स्वतःच तिचे सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून थिएटरमधील तिच्या पात्राबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्साह कायम आहे.

वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर, कतरिना कैफ 'टायगर 3' साठी खूप मेहनत घेत आहे, जेणेकरून ती तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करू शकेल. अभिनेत्रीचा शेवटचा चित्रपट 'फोनभूत' बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला होता, त्यामुळे आता ती प्रेक्षकांना प्रभावित करण्याची एकही संधी सोडू इच्छित नाही.पठाणनंतर आता शाहरुख खान आणि सलमान खान पुन्हा एकदा टायगर 3 मध्ये एकत्र दिसणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा विवाह ९ डिसेंबर २०२१ रोजी झाला होता. लग्नानंतर कतरिना अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.