बिपाशा बासू पाठोपाठ कतरिना देणार गुडन्यूज; व्हायरल व्हिडिओमुळे एकच खळबळ

गेले बरेच दिवस कतरिना कैफच्या प्रेग्नंसीच्या बातम्यांनी जोर धरला आहे.

Updated: Aug 16, 2022, 09:36 PM IST
बिपाशा बासू पाठोपाठ कतरिना देणार गुडन्यूज; व्हायरल व्हिडिओमुळे एकच खळबळ title=

मुंबई : गेले बरेच दिवस कतरिना कैफच्या प्रेग्नंसीच्या बातम्यांनी जोर धरला आहे. जेव्हा आलिया आणि रणबीर कपूरने पालक होण्याची घोषणा जाहीर केली तेव्हापासून  कतरिना आणि विकीदेखील लवकरच पालक होणार अशी चर्चा सुरु होती. आता पुन्हा एकदा एका व्हिडिओवरुन अशा चर्चांना उधाण आलं आहे. 

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये कतरिना एअरपोर्टवर दिसत आहे. यावेळी अभिनेत्रीने सैल कपडे परिधान केले आहेत. कतरिनाने यावेळी भगव्या रंगाची जॉगर्स आणि पांढऱ्या रंगाचं लाँन्ग स्लिव्ह्स टी-शर्ट घातलं आहे. याच बरोबर हा लूक पुर्ण करण्यासाठी तिने पोनी बांधली आहे. तसंच डोळ्यांवर गॉगल्स घातले आहेत.  तिचा हा लूक पाहताच चाहते असा अंदाज बांधू लागले आहेत की, कतरिना लवकरच गुडन्यूज देऊ शकते.

कतरिनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते ती प्रेग्नंट असल्याचं म्हणत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करत एका चाहत्याने लिहीलंय की, हा बेबी बंप आहे का? तर दुसऱ्या एका युजर्सने लिहीलंय की, कतरिना खूप क्यूट मम्मी होईल. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय की, ही नक्कीच प्रेग्नंट आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 तर अजून एका चाहत्याने कमेंट करत सांगितलं आहे की, ती त्यापैकी एक आहे जी सगळ्यात फिट आणि फ्लॅट टम्मी मम्मी आहे. अशा अनेक प्रकारच्या कमेंट अभिनेत्रीच्या व्हिडिओ वर येत आहेत. पण या सगळ्या चर्चांनंतरही यावर कतरिना कैफने काहीच स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे आता प्रेक्षक आता हे कपल कधी गुडन्यूज देतात यावर लक्ष ठेवून आहेत.