'झिरो'मध्ये शाहरुख नाही तर या अभिनेत्यासोबत दिसणार कतरिना

किंग खान शाहरुखच्या झिरो या सिनेमाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

Updated: Apr 12, 2018, 06:14 AM IST
'झिरो'मध्ये शाहरुख नाही तर या अभिनेत्यासोबत दिसणार कतरिना title=

मुंबई : किंग खान शाहरुखच्या झिरो या सिनेमाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. या सिनेमात कतरिना कैफ शाहरुखच्या अपोझिट दिसणार असल्याची चर्चा होती. पण कतरिना या सिनेमात शाहरुखच्या नाही तर दुस-या अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

तिन्ही खान बॉलिवूडची बार्बी डॉल  कतरिना कैफचे दिवाने आहेत. पण आता या यादीत आणखी  एका अभिनेत्याची भर पडलीये. 'झीरो' या सिनेमात कतरिना जरी शाहरुख खानसोबत दिसणार असली तरी कतरिनासोबत रोमांस करण्याचा चान्स मात्र दुस-या अभिनेत्यला मिळाला आहे... त्याचं नाव आहे अभय देओल..

अभय कतरिनासोबत या सिनेमात रोमान्स करणार आहे. अभय पण कतरिनाबरोबर रोमान्स करायला मिळणार असल्यामुळे प्रचंड उत्साही आहे. अभय देओलने कतरिनासोबत 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटात काम केलं होतं. पण या चित्रपटात कतरिना हृतिक रोशनच्या अपोझिट होती. झीरोमध्ये मात्र कॅट अभय बरोबर स्क्रिन शेअर करणार आहे..त्यामुळे कतरिनाच्या चाहत्यांना तिची अभय बरोबरची जोडी आवडते का हे हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावरचं कळेलं.