लॉटरी लागली; KBC मधील स्पर्धकासोबत बिग बी जाणार डिनर डेटवर!, कोण आहे ती नशिबवान?

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन हे सध्या 'कौन बनेगा करोडपती'चे सुत्रसंचालन करत आहेत. अशात आता अमिताभ हे एका स्पर्धकासोबत चक्क डिनर डेटवर जाणार आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 29, 2023, 01:10 PM IST
लॉटरी लागली; KBC मधील स्पर्धकासोबत बिग बी जाणार डिनर डेटवर!, कोण आहे ती नशिबवान? title=
(Photo Credit : Social Media)

Amitabh Bachchan : 'कौन बनेगा करोड़पति 15' या कार्यक्रमाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडची सुरुवात ही तजिंदर कौर यांच्याकडून झाली. त्यांनी गेल्या एपिसोडमध्ये 3 लाख 20 हजार रुपये जिंकले होते. त्यांनी शोचे सुत्रसंचालक अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांच्या पतीसोबत काही आठवणी शेअर केल्या होत्या. त्यांत्या पतीला ना चित्रपट पाहण्याची आवड होती ना गाणी ऐकण्याची आवड. लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर त्यांच्याकडे रेडिओ नव्हता आणि तजिंदर कौर यांना गाणी ऐकायची होती म्हणून त्यांना रेडिओ खरेदी केला. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमिताभच्या चाहत्या असणाऱ्या तजिंदर यांना जेवायला घेऊन जाणार आहेत. 

खरंतर बिग बींनी खेळाची सुरुवात ही 'सुपर संदूक' राऊंडनं केली. तजिंदर कौर यांनी इतिहास रचला आहे. त्यांनी सगळ्या दहा प्रश्नांची उत्तर दिली आणि 1 लाख रुपये जिंकले. त्या त्याची ऑडियन्स पोल ही लाइफलाइन पुन्हा एकदा वापरतात. त्यानंतर बिग बी यांनी त्यांना सांगितलं की त्यांनं वचन दिलं होतं की जी पण व्यक्ती सगळ्या 10 प्रश्नांची योग्य उत्तर देईल ते त्या व्यक्तीला जेवायला घेऊन जातील. हे ऐकल्यानंतर तजिंदर आनंदी होतात. त्यावर बिग बी सांगतात की ते डिनरसाठी एकत्र बाहेर जातील आणि त्यांच्यासोबत दुसरं कोणी नसेल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यातही जेव्हा तजिंदर कौर यांनी शेवटच्या प्रश्नासाठी लाइफलाइन वापरली तेव्हा त्यासाठी त्यांनी बिग बींना दोषी ठरवले. त्या म्हणाल्या की त्यांच्या चष्मासमोर धुकं आलं तेव्हा त्यांनी ते पुसून पुन्हा त्यांना चष्मा घातला.  त्याची पुढची पाच मिनिटं त्यांना काही कळलंच नाही. जेव्हा बिग बी या गोष्टीवर हसले तेव्हा त्या म्हणाल्या की राज कपूर हे त्यांचे लहाणपणीचे क्रश होते, पण तरुणपणी त्यांना राज कपूर यांच्या पेक्षा अमिताभ आवडू लागले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'आता आम्ही पण पाकिस्तानी कलाकारांना बोलवायचं का..?' पाक टीमच्या स्वागतावर 'Raees' दिग्दर्शकाचा सवाल

दरम्यान, तजिंदर जेव्हा 1 कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्या तेव्हा सगळा खेळ खराब झाला. आतापर्यंत जिंकलेले सगळे पैसे त्या त्यांच्या नावावर करू शकल्या नाही. तो प्रश्न काय होता ते जाणून घेऊया... सुहेली ही नौका ज्यामध्ये रॉबिन नॉक्स-जॉन्स्टननं एकट्या जहाजाने न थांबता जगाची परिक्रमा करणारी पहिली व्यक्ती ठरली, ती कोणत्या शहरात बांधली गेली? त्यांना या प्रश्नाचं उत्तर माहित नसल्यानं त्यांनी 'ऑडियंस पोल' आणि 'वीडियो कॉल ए फ्रेंड' यांची मदत घेतली. तजिंदर यांनी खेळ तिथेच सोडला आणि त्या 50 लाख रुपये सोबत घेऊन गेल्या. तर तुम्हालाही या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय असा प्रश्न पडला असेल तर त्याचं योग्य उत्तर हे 'मुंबई' आहे.