KBC 13 : दोन्ही डोळ्यांनी दिसत नसलं तरी, हिमानीकडे ज्ञानाची दृष्टी... गाठला 1 कोटीचा पल्ला

लोकांना कोट्यधीश आणि करोडपती बनवणारा 'कौन बनेगा करोडपती'चा 13 वा सीझनची सुरूवात झाली आहे.

Updated: Aug 26, 2021, 04:41 PM IST
KBC 13 : दोन्ही डोळ्यांनी दिसत नसलं तरी, हिमानीकडे ज्ञानाची दृष्टी... गाठला 1 कोटीचा पल्ला title=

मुंबई : लोकांना कोट्यधीश आणि करोडपती बनवणारा 'कौन बनेगा करोडपती'चा 13 वा सीझनची सुरूवात झाली आहे. शो लवकरच त्यांचा पहिला कोट्यधीश मिळवू शकतो, ती सुद्धा एक महिला. केबीसीचा 13 वा सीझन 23 ऑगस्टपासून सुरू झाला आहे आणि अलीकडेच सोनी टीव्हीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक त्याचा प्रोमो रिलीज केला आहे ज्यात एक महिला 1 कोटींच्या प्रश्नावर पोहोचलेली दिसत आहे. त्यात कौतुकास्पद गोष्ट अशी आहे की, या व्हिडीओमधील महिला दृष्टिहीन आहेत, तरीदेखील ती इतकी हुशार आहे आणि इतका जबरदस्त खेळ खेळली आहे की, ते 1 कोटीपर्यंत पोहोचली आहेत.

या व्हिडीओमध्ये बिग बींनी हिमानी जी दृष्टिहीन असल्याचे सांगितले आणि नंतर प्रोमोमध्ये अमिताभ थेट 1 कोटी रुपयांचा प्रश्न विचारताना दिसले. मात्र, तो प्रश्न काय आहे आणि हिमानी 1 कोटीच्या प्रश्नाचे योग्य उत्तर देऊ शकतील का, हे प्रोमोमध्ये दाखवले नाही.

हिमाणी बुंदेल आग्रा येथील रहिवासी आहेत आणि केंद्रीय विद्यालयात गणिताच्या शिक्षिका आहेत. दृष्टी असूनही मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हिमाणी आज आयुष्याच्या उंची पर्यंत पोहोचू शकल्या आहेत.

हिमाणी यांना खरेतर डॉक्टर व्हायचे होते, पण वयाच्या 15 व्या वर्षी तिने एका अपघातात आपली दृष्टी गमावली. अपघातानंतर तिचे हे स्वप्न तुटले परंतु तरीही ती काही तुटली नाही. तिने कधीही आपली हिंम्मत हारली नाही. तिच्या या गोष्टीवर मात करण्यासाठी तिने आणि तिच्या कुटूंबाने खूप मेहनत घेतली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नंतर त्यांनी ह्यूमिनिटी या विषयातून पदवी प्राप्त केली आणि बीएड झाल्यानंतर, मेहनतीच्या आधारावर त्यांची केंद्रीय विद्यालयात निवड झाली. हिमानी गेली चार-पाच वर्षे केबीसीमध्ये नोंदणी करत होती. परंतु या वर्षी तिचा नंबर लागला.