विवाहीत पुरुषांना Amitabh Bachchan यांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले...

Amitabh Bachchan यांनी विवाहीत पुरुषांना एका सल्ला दिला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अमिताभ यांनी हा सल्ला Kaun Banega Crorepati मध्ये दिला आहे. 

Updated: Nov 24, 2022, 02:58 PM IST
विवाहीत पुरुषांना Amitabh Bachchan यांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले... title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सुत्रसंचालन करत असलेल्या या शोचे सध्या 14वं (Kaun Banega Crorepati 14) सीझन सुरु आहे. शोमध्ये अमिताभ बऱ्याचवेळा  प्रेक्षकांसोबत त्यांच्या खासगी आयुष्याविषयी बोलताना दिसतात. यावेळी अमिताभ वैवाहिक जीवनाविषयी एक मोलाचा सल्ला देताना दिसत आहेत. 

हेही वाचा : Viral Video : लाइव्ह स्टेज शो मध्ये अभिनेत्रीसोबत गैरवर्तन, Actress वर चक्क उडवल्या नोटा

बिरेन वाला या स्पर्धकानं बिग बींना सांगितले की, त्यांनी पत्नीसोबत एक अट ठेवली होती की, जर ते बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर बसले तर त्यांना त्यांच्या आवडीचे जेवण खायला मिळेल आणि जर असं झालं नाही तर पत्नी जे काही बनवेल ते गप्प खाणार. बिरेन वाला यांनी शेवटी 3 लाख 20 हजार रुपयांची रक्कम जिंकली. यासोबतच त्यांनी पत्नीसोबत लावलेली पैजही जिंकली. बिरेन यांनी अमिताभ बच्चन यांना त्यांची पत्नी जया बच्चन यांचा व्हिडिओही दाखवला. 

अमिताभ यांनी विवाहित पुरुषांना कोणता सल्ला दिला?

गेल्या वर्षीचा KBC चा हा व्हिडिओ होता. जया बच्चनसोबत श्वेता बच्चन आणि तिची लेक नव्या नवेली नंदाही उपस्थित होती. शोमध्ये श्वेता आणि नव्या पाहुण्या म्हणून आल्या होत्या. त्यानंतर जया बच्चन यांनी व्हिडिओ पाठवला. पत्नीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर बिग बी म्हणाले, ' हे बघा सर, पत्नी विषयी जास्त चढ-उतार नसावेत, ती जे काही बोलेल, ते शांतपणे ऐकायला पाहिजे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, अमिताभ यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर अमिताभ सगळ्यात शेवटी 'ऊंचाई' या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत नीना गुप्ता, अनुपम खेर, बोमन इराणी आणि डॅनी आहेत. दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.