KBC 14 : 25 लाखांच्या 'या' प्रश्नावर स्पर्धकाने सोडला खेळ; तुम्हाला याचं उत्तर माहितेय का?

25 लाखांच्या प्रश्नावर येईपर्यंत त्याच्याकडे लाइफलाइन उरली नव्हती

Updated: Oct 22, 2022, 11:05 AM IST
KBC 14 : 25 लाखांच्या 'या' प्रश्नावर स्पर्धकाने सोडला खेळ; तुम्हाला याचं उत्तर माहितेय का? title=

KBC 14 : मध्य प्रदेश (Madhya Pradesh) बरवाहचा सॉफ्टवेअर इंजिनिअर गगनदीप सिंग भाटिया (gagandeep singh bhatia) कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) सीझन 14 च्या 21 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये सहभागी झाला होता. शोच्या एक दिवस आधीच्या एपिसोडमध्येही त्याची झलक पाहायला मिळाली होती.  गगनदीप सिंगने पहिला टप्पा खूप लवकरच पार केला आणि दुसऱ्या टप्प्याच्या दिशेने वेगाने जाऊ लागला. मात्र 3 लाख 20 हजारांचा प्रश्न पोहोचण्याआधीच त्याने आपल्या दोन लाईफलाईन गमावल्या होत्या. (KBC 14 gagandeep singh bhatia stuck on amitabh bachchan 25 lakh question)

यानंतर 3 लाख 20 हजारांच्या प्रश्नापुढे सरकत असताना गगनदीपने शेवटची लाईफलाईनही (Lifeline) गमावली. एक-दोन प्रश्नांवर त्याने धोकाही पत्करला मात्र कसातरी तो 25 लाखांच्या प्रश्नावर पोहोचला. 25 लाखांच्या प्रश्नावर येईपर्यंत त्याच्याकडे लाइफलाइन उरली नव्हती आणि गगनदीपला त्याच्या समोर असलेल्या प्रश्नाचे अचूक उत्तर माहित नव्हते.

गगनदीप या प्रश्नाच्या योग्य उत्तराचा अंदाज घेण्याच्या विचारात करत असताना अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांनी त्याला सांगितले की तू 12 लाख 50 हजार रुपये जिंकले आहेत आणि चुकीचे उत्तर दिल्यास 3 लाख 20 हजारांवर पोहोचशील. गगनदीपने थोडा वेळ विचार केला आणि खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. पण तुम्हाला या  25 लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर माहितीय का? 

अमिताभ बच्चन यांनी गगनदीप सिंगला रणजी ट्रॉफीमध्ये (ranji trophy) एका डावात सर्वाधिक धावा आणि डावात सर्वात कमी धावा करण्याचा अनोखा विक्रम कोणत्या संघाच्या नावावर आहे? असा प्रश्न विचारला होता. यासाठी सौराष्ट्र, मुंबई, हैदराबाद, कर्नाटक असे पर्याय दिले होते. या प्रश्नाच्या उत्तरावर गगनदीप कर्नाटक आणि सौराष्ट्र यांच्यात गोंधळात पडला होता पण अचूक उत्तर हैदराबाद होते.