ऐश्वर्या नाही बच्चन कुटुंबाचा भाग? बिग बींच्या वाढदिवसानिमित्तानं 'केबीसी 16' तं जे पाहिलं त्यानं मिळाली हिंट

Aishwarya Rai : ऐश्वर्या राय आता बच्चन कुटुंबाचा भाग नाही? त्या व्हिडीओमुळे एकच चर्चा 

दिक्षा पाटील | Updated: Oct 14, 2024, 11:20 AM IST
ऐश्वर्या नाही बच्चन कुटुंबाचा भाग? बिग बींच्या वाढदिवसानिमित्तानं 'केबीसी 16' तं जे पाहिलं त्यानं मिळाली हिंट title=
(Photo Credit : Social Media)

Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. खरंतर, आतापर्यंत ज्या गोष्टी लोकांच्या लक्षात राहिलेली ती गोष्ट 'कौन बनेगा करोडपति 16' मध्ये दिसून आली आहे. नुकताच 11 ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन यांचा 82 वा वाढदिवस झाला. त्या निमित्तानं आमिर खान आणि त्याचा मुलगा जुनैद खाननं स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. त्या संपूर्ण एपिसोडमध्ये बिग बींच्या या स्पेशल दिवसाला सेलिब्रेट करण्यासाठी काही स्पेशल व्हिडीओ दाखवण्यात आले. खरंतर, या सगळ्यात बच्चन कुटुंब ऐश्वर्याला पूर्णपणे विसरलं. 

खरंतर, या शोमध्ये व्हिडीओ दाखवण्यात आला, त्यात बच्चन कुटुंबाचे सगळे सदस्य दिसणार आहेत. मात्र, अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या रायशिवाय घरातील इतर सगळे सदस्य दिसले. या सगळ्या क्लिप्समध्ये जया बच्चनसोबत अभिषेक, श्वेता आणि इतकंच नाही तर त्यांच्यासोबत अगस्त, नव्या आणि आराध्या देखील त्या व्हिडीओमध्ये होते. पण या सगळ्यात कोणाचा चेहरा दिसला नाही तर तो आहे ऐश्वर्या रायचा. 

अभिषेक, श्वेता आणि अगस्त्यनं बिग बीच्या वाढदिवसासाठी एक व्हिडीओ मेसेज देखील शेअर केला होता आणि त्यासोबत आराध्याचे काही फोटो देखील दाखवले होते. पण संपूर्ण व्हिडीओत ऐश्वर्या कुठेच दिसली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा बच्चन कुटुंबासोबत ऐश्वर्याचं नातं चांगलं नाही असं म्हटलं जाऊ लागलं आहे. 

हे पहिल्यांदा झालेलं नाही जेव्हा कुटुंबात सुरु असलेल्या गोष्टींवरून अशा काही चर्चा सुरु झाल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा अमिताभ बच्चन यांचं कुटुंब हे अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नात एकत्र दिसलं तर दुसरीकडे ऐश्वर्या आणि आराध्या दिसले. बऱ्याच काळापासून अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाची चर्चा रंगू लागली आहे. मात्र, बच्चन कुटुंब किंवा अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्यात नक्की कशामुळे दुरावा आला आहे हे कोणालाही माहित नाही. पण खरंच त्यांच्यात दुरावा आला आहे का असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या ही लेक आराध्यासोबत अभिषेक बच्चनसोबत दिसली होती.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x