भर सेटवर असं काय घडलं की, बिग बीं अक्षय आणि कतरिनावर चिडले, पाहा व्हिडीओ

अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी अनेक स्पर्धक नोंदणीपासून हॉटसीटपर्यंत लांबचा प्रवास करुन येतात, पण..

Updated: Nov 23, 2021, 06:49 PM IST
भर सेटवर असं काय घडलं की, बिग बीं अक्षय आणि कतरिनावर चिडले, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती'मध्ये सर्वसामान्यांपासून ते मोठ मोठे लोकांपर्यंत सगळंच लोकं आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात. सर्वसामान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळंच लोकं या शोला फॉलो करतात. काही लोकं पैसे जिंकून स्वत:चे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने येतात, तर काही लोकं हे पैसे जिंकूण एखाद्या NGOला देतात. यांपैकी बरेच स्पर्धक हे बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना पाहायला म्हणून खास येतात. कारण एवढ्या मोठ्या स्टारला भेटणं हे अनेकांचं स्वप्न आहे.

अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी अनेक स्पर्धक नोंदणीपासून हॉटसीटपर्यंत लांबचा प्रवास करुन येतात, पण विचार करा की, अशा स्पर्धकांच्या वागण्यामुळे अमिताभ बच्चन यांना कधी राग आला तर? ही गोष्ट त्या स्पर्धकासाठी किती धक्कादायक आणि लाजिरवाणी असेल. त्यामुळे प्रत्येक स्पर्धक अशी कोणतीही चूक करणार नाहीत, ज्यामुळे त्यांच्यावरती अशी वेळ येईल.

परंतु अशी एक घटना घडली आहे, ज्यामध्ये स्पर्धकांवरती अमिताभ बच्चन यांना राग आला. परंतु हे स्पर्धक कोणतेही सर्वसामान्य स्पर्धक नसून बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि कतरिना कैफ आहे.

कतरिना कैफवर अमिताभ यांचा राग

टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती'च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांचा राग पाहायला मिळाला. शोच्या या स्पेशल एपिसोडमध्ये अभिनेता अक्षय कुमार, कतरिना कैफ आणि रोहित शेट्टी त्यांच्या 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. अक्षय कुमार आणि कतरिना कैफ हॉटसीटवर बसून अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत.

अमिताभ बच्चन सेट सोडून गेले

शो दरम्यान प्रश्न विचारताना असं काही तरी घडतं, ज्यामुळे अमिताभ बच्चन यांना वाटले की, गेममध्ये फसवणूक केली जात आहे. यावर अमिताभ बच्चन यांनी आक्षेप घेतल्याने ते चांगलेच संतापले. 21 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अमिताभ बच्चन शूटिंगदरम्यान खुर्ची सोडून सेटवरून निघून गेल्याचे घडले. परिस्थिती अशी बनली की संपूर्ण सेटवर आणि प्रेक्षकांमध्ये शांतता पसरली. सगळे एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत होते.

रोहित शेट्टीने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला आणि क्रू मेंबरसह सेटच्या मागे गेला. नंतर त्याने अक्षय कुमारला फोन केला आणि दोघेही एकत्र सेटच्या मागे गेले. सेटवर कतरिना कैफ एकटीच बसली होती आणि तिचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार परत आले आणि त्यांनी कतरिनाला समजावून सांगितले की, शोमध्ये असे पहिल्यांदाच घडले आहे.

कतरिना कैफ जवळ-जवळ रडायला आली

कतरिनाचा चेहरा पडला आणि ती एक प्रकारे स्वत:ला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करताना दिसली. अभिनेत्री अविश्वासाने बसली. त्यानंतर काही वेळाने अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार सेटवर हसत हसत परतले. अमिताभ बच्चन हसले आणि म्हणाले की, सेटवर अक्षय कुमार असताना असे होणे स्वाभाविक आहे. मात्र, अक्षय कुमार अमिताभच्या सेटवर या संपूर्ण नियोजनाची जबाबदारी घेताना दिसला.

खरेतर जेव्हा अमिताभ बच्चन अक्षय आणि कतरिनाला प्रश्न विचारणार इतक्यात अक्षय कुमार कतरिनाच्या हाताला काहीतरी खून करतो, तेव्हा बिग बींना असे वाटते की, काही तरी खेळात खाणाखूणा होऊन फसवणूक होत आहे आणि ते रागाने तेथून उठून गेले. खरेतर त्यांनी कतरिनासोबत प्रँक केलं होता, हे शेवटी उघड झाले. परंतु हा व्हिडीओ आणि कतरिनाची अवस्था सोशल मीडियावर भलतीच व्हायरल होत आहे.