VIDEO : अक्षयच्या 'केसरी'चा टीझर प्रदर्शित

अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षीत सिनेमा केसरी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. निर्मात्यांनी सिनेमाचा पहिला लूक प्रदर्शित केला. 

Updated: Feb 12, 2019, 03:42 PM IST
VIDEO : अक्षयच्या 'केसरी'चा टीझर प्रदर्शित  title=

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षीत सिनेमा केसरी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. निर्मात्यांनी सिनेमाचा पहिला लूक प्रदर्शित केला. सिनेमात खिलाडी अक्षय कुमारसोबत अभिनेत्री परिणीती चोप्रा झळकणार आहे. अनुराग सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली साकारण्यात आलेला सिनेमा ऐतिहासिक कथेवर आधारलेला आहे. १८९७ साली झालेल्या सारगढीच्या लढाईत ब्रिटीश भारतीय सेनेच्या २१ शिख जवानांनी १० हजार अफगाणी सैनिकांशी झुंज दिली होती. या सिनेमाचं कथानक लढाईत सहभागी असलेले हवालदार ईशर सिंह यांच्या शौर्यावर आधारलेलं आहे. इतिहासातील सर्वात कठीण युद्धातील हे एक युद्ध होते. 

 

केसरी सिनेमातील अक्षयची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सिनेमाचा पहिला प्रमोशनल व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमा २१ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. 'केसरी' सिनेमाचे कथालेखण गिरीश कोहली आणि अनुराग सिंग यांनी केले आहे. सिनेमाची निर्मिती अनेक निर्मात्यांनी मिळून केली आहे... त्यापैंकी एक करण जोहर आहे. सिनेमाचे अनेक पोस्टर सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेत. सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल मारेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.