KGF स्टारची कॅन्सरशी झुंज, आर्थिक संकटात सापडल्याने मदतीचं आवाहन

KGF मधील अभिनेता सध्या कॅन्सरशी झुंज देत असून त्याने मदतीचं आवाहन केलंय.

Updated: Aug 28, 2022, 03:14 PM IST
KGF स्टारची कॅन्सरशी झुंज, आर्थिक संकटात सापडल्याने मदतीचं आवाहन  title=

KGF: 'KGF: Chapter 2' सिनेमाने भरपूर प्रसिद्धी मिळवली. केजीएफचा दुसरा भाग पाहण्यासाठी लोकांमध्ये खूपच उत्सूकता दिसत होती. त्यानंतर आता लोकांना केजीएफच्या तिसऱ्या भागाची उत्सूकता लागली आहे. केजीएफ सिनेमा या वर्षातला सर्वात मोठा सिनेमा ठरला आहे. सर्वच कलाकारांनी सिनेमात दमदार अभिनय केला आहे. असाच एक कलाकार म्हणजे हरीश राय. पण हा अभिनेता सध्या आर्थिक संकटात आहे. अभिनेत्याने नुकतीच आर्थिक मदतीची विनंती केली आहे. केजीएफ फेम अभिनेत्याने खुलासा केला आहे की तो गेल्या 3 वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत आहे.

हरीश राय हे कॅन्सरसोबत लढत आहेत. आपल्या आजाराबद्दल खुलासा करताना ते म्हणाले की, परिस्थिती तुम्हाला मोठेपण देऊ शकते किंवा गोष्टी तुमच्यापासून हिरावून घेऊ शकते. यातून सुटण्याचा मार्ग नाही. मी 3 वर्षांपासून कर्करोगाशी लढत आहे. 'KGF' मध्ये माझ्या लांब दाढीमागे एक कारण होते आणि ते म्हणजे हा आजार. या आजारामुळे मानेला आलेली सूज लपविण्यासाठी मी मुंडण केले होते.

KGF 2 actor Harish Rai suffers from throat cancer, says he 'covered swelling under beard' for film!

कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात आहेत

हरीश पुढे म्हणाले की, 'माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी माझी शस्त्रक्रिया आधी पुढे ढकलली होती. मी चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत वाट पाहिली. आता मी चौथ्या टप्प्यात आहे, गोष्टी फक्त वाईट होत आहेत. अभिनेत्याने असेही सांगितले की, आधी त्यांना थायरॉईड होता, ज्याने नंतर कर्करोग रूप धारण केले.' आपले चाहते आणि इंडस्ट्रीतील लोकांकडून मदत मागण्यासाठी त्यांनी एक व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला होता, परंतु तो पोस्ट करण्याचे धाडस करू शकले नाही.

कन्नड चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते हरीश राय बहुतांशी नकारात्मक भूमिका करतात. KGF व्यतिरिक्त त्याने 'जोडी हक्की', 'तायव्वा', 'संजू वेड्स गीता' सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. केजीएफमध्ये हरीश राय यांनी कासिम चाचाची भूमिका साकारली होती.