60 वर्षीय व्यक्ती घरामध्ये घसरुन पडतात. सुरुवातीला आपल्या गुडघ्यांवर आणि नंतर मागच्या बाजूला ते कोसळतात. असह्य वेदना होत असताना त्यांना रुग्णालयातील इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेलं जातं. यावेळी ते डॉक्टरांना आपल्या प्रायव्हेट पार्टमध्येही वेदना होत असल्याचं सांगतात. डॉक्टर सर्वात आधी कोणत्याही प्रकारची सूज आहे का? किंवा द्रव बाहेर पडतंय का? याची तपासणी करतात. मात्र त्यांना काहीच मिळत नाही.
यानंतर डॉक्टर त्यांच्या शरिरातील कमरेखालील भागाचा एक्स-रे काढतात, जेणेकरुन एखादं हाड मोडलं असेल तर त्याची माहिती मिळेल. पण एक्स-रेमध्ये जे दिसतं ते पाहून डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसतो. डॉक्टरांना त्यांच्या गुप्तांगामध्ये एक हाड दिसलं. डॉक्टरांनी सांगितलं की, हा अत्यंत दुर्मिळ आजार पेनाईल ओसीफिकेशन (Penile Ossification) आहे.
Diagnostic dilemma: A man's penis was turning to bone https://t.co/pBIqdTeocy
— Live Science (@LiveScience) December 18, 2024
या रोगात, अवयवाच्या मऊ उतींमध्ये कॅल्शियम जमा झाल्यामुळे अतिरिक्त हाडे बाहेर येऊ लागतात. डॉक्टरांनी वृद्धाला पुढील उपचार करायचे आहेत का? अशी विचारणा केली. परंतु वृद्धाने पुढील तपास किंवा उपचार करण्यास नकार दिला. डॉक्टरांनी सांगितले की या आजारावर सहसा वेदनाशामक औषध देऊन उपचार केले जातात.
यावरील उपचार शॉक थेरपीने केले जातात. ज्यामध्ये ध्वनिलहरी वापरल्या जातात. या ध्वनी लहरी आहेत, ज्या हाडं छोट्या तुकड्यांमध्ये मोडतात. आतापर्यंत विज्ञान साहित्यात अशा आजाराची 40 प्रकरणं समोर आली आहेत. ही प्रकरणं दुर्मिळ असून त्यांना सहसा Peyronie's Disease शी जोडलं जातं.
हा आजार 40 ते 70 वर्षापर्यंतच्या कोणत्याही पुरुषाला होऊ शकतो. Peyronie's Disease मध्ये, पुरुष पुनरुत्पादक अवयवाच्या ऊती जळू लागतात. यामुळे नवीन ऊती तयार होतात. यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होते. किंवा एखाद्याला अत्यंत वेदनादायक संवेदनांचा सामना करावा लागतो. म्हातारपणी होणारे किडनीचे आजार, पोट खराब होणे, आघात येणे किंवा सूज येणे आदींमुळेही हा आजार होतो.