'याच्या'कडे आहे जगातील सगळं सोनं? इतका जबरदस्त व्हिडीओ तुम्ही कधीच पाहिला नसेल

या मुलाकडे जगातील सर्व सोनं आहे का?

Updated: Mar 28, 2022, 10:04 AM IST
'याच्या'कडे आहे जगातील सगळं सोनं? इतका जबरदस्त व्हिडीओ तुम्ही कधीच पाहिला नसेल  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : 'आई.... मी एक दिवस जगातील सर्व सोनं तुला आणून देईन', असं आपल्या आईला वचन देणाऱ्या एका मुलानं सर्वांच्याच नजरा वळवल्या. यानंतर चर्चा सुरु झाल्या त्याम्हणजे, या मुलाकडे जगातील सर्व सोनं आहे का? याबाबतच्या... 

खरंच या मुलाकडे जर जगातील सर्व सोनं आलं, तर त्याचे परिणाम नेमके काय होतील याची तुम्ही अपेक्षा तरी केली आहे का? 

नाही.... मग सध्या कमाल गाजणारा हा व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवा. कारण हा व्हिडीओ तुम्हालाही थक्क करेल असाच आहे. 

हा व्हिडीओ आहे, अभिनेता यश याची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या KGF Chapter 2 'केजीएफ चॅप्टर 2' या चित्रपटाचा. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.  (KGF Chapter 2 trailer)

सोशल मीडियावर हा ट्रेलर अवघ्या काही क्षणांतच व्हायरलही झाला आहे. यामध्ये अभिनेता संजय दत्त अधीराच्या रुपात खलनायकी भूमिका साकारताना दिसत आहे. 

रॉकी भाई, च्या रुपात दिसणारा अभिनेता यश, हासुद्धा चाहत्यांच्या नजरा वळवत आहे. 

केजीएफ म्हटलं की, साहसी दृश्यांचा भरणा आलाच. तर, ही साहसी दृश्यही यामध्ये खचून भरली आहेत असं म्हणायला हरकत नाही. 

कारण, जर ट्रेलरच इतका जबरदस्त असेल तर चित्रपट किती तगडा असेल याचा अगदी सहज अंदाज लावता येत आहे. 

14 एप्रिलला हा चित्रपट कन्नड, तेलुगू,हिंदी आणि मल्याळम या भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित होणार आहे. प्रशांत नीलची पटकथा आणि दिग्दर्शन असणाऱ्या या चित्रपटामध्ये अभिनेता रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्याही निर्मिती संस्थेची गुंतवणूक असल्याचं सांगण्यात येत आहे. 

तेव्हा आता प्रदर्शनानंतर हा चित्रपट पहिल्या भागाप्रमाणे दमदार कमाई करतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.