'खुळ्यागत येड्या पाटलाची शहाणी पाटलीण!' लग्नाच्या वाढदिवशी क्षिती जोगच्या पतीची पोस्ट व्हायरल!

 सध्या 'झिम्मा 2' या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ आहे. सगळीकडे या सिनेमाचे हाऊसफुल्ल शो पाहायला मिळत आहेत. एनिमल आणि सॅम बहादूर हे बॉलिवूडचे दोन मोठे सिनेमा सिनेमागृहात आपले पाय घट्ट रोवून असताना एकीकडे 'झिम्मा 2' हा सिनेमादेखील हाऊसफुल्लचे बोर्ड झळकवताना दिसत आहे. 

Updated: Dec 7, 2023, 01:38 PM IST
'खुळ्यागत येड्या पाटलाची शहाणी पाटलीण!' लग्नाच्या वाढदिवशी क्षिती जोगच्या पतीची पोस्ट व्हायरल! title=

मुंबई : सध्या 'झिम्मा 2' या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ आहे. सगळीकडे या सिनेमाचे हाऊसफुल्ल शो पाहायला मिळत आहेत. एनिमल आणि सॅम बहादूर हे बॉलिवूडचे दोन मोठे सिनेमा सिनेमागृहात आपले पाय घट्ट रोवून असताना एकीकडे 'झिम्मा 2' हा सिनेमादेखील हाऊसफुल्लचे बोर्ड झळकवताना दिसत आहे. सध्या सोशल सोशल मीडियावर 'झिम्मा 2' सिनेमाचा बोलबाला आहे.  'झिम्मा 2' हा सिनेमा त्यातील स्टारकास्टमुळे देखील चर्चेत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन हेमंत ढोमेने केलं आहे. तर क्षिती जोग या सिनेमाची निर्माती आहे. खऱ्या आयुष्यात पती पत्नी म्हणूनही ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. 

११ वर्षांपुर्वी या जोडीने एकमेकांसोबत सप्तपदी घेत हे दोघं आयुष्यभराचे सोबती झाले आहेत. आज या दोघांच्या सुखी संसाराला ११ वर्ष पुर्ण झाले आहेत.  हेमंत आणि क्षितीची पहिली भेट एका नाटकादरम्यान झाली होती. त्याआधी दोघेही एकमेकांना ओळखत होते परंतु, त्यांच्यात मैत्री या नाटकाच्या निमित्ताने झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनीही याबद्दल घरच्यांना कल्पना दिली. दोन्ही कुटुंबांकडून हेमंत-क्षितीच्या नात्याला परवानगी मिळाल्यावर त्यांनी लगेच घरच्या घरी साखरपुडा केला आणि त्यानंतर वर्षभराच्या आत दोघांचं लग्न झालं.

नुकतीच हेमंतने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत हेमंत ढोमे खूप मजेदार असं कॅप्शन या पोस्टसोबत लिहीलं आहे. ही पोस्ट शेअर करत हेमंतने लिहीलं आहे की, ''११ वर्षांपुर्वी जगातली सगळ्यात भारी गोष्ट घडली! या येड्या पाटलाला त्याची शहाणी पाटलीण मिळाली! तुला तर माहितीच आहे @kshiteejog आपलं लय खुळ्यागत प्रेम आहे… गाणं पण तेच आहे… (या गाण्यावर पटली राव!)''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनेकांनी हेमंतच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने लिहीलंय, पाटील आणि पाटलीण बाई ना लग्न वाढदिवसाच्या ट्रक भरून शुभेच्छ. तर अजून एकाने लिहीलंय, तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे, यश तुम्हाला भर भरून मिळू दे, लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला गोड गोड शुभेच्छा. तर अजून एकाने म्हटलंय, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमची जोडी अशीच कायम राहू तर अजून एकाने लिहीलंय तर अनेक कलाकारांनी देखील या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.