खुशी 'या' अभिनेत्याच्या मुलासह डेब्यू करण्यास इच्छुक

जान्हवी कपूरची लहान बहीण खूशी कपूर मोठ्या पडद्यावर आपली अदाकारी दाखवण्यास सज्ज झाली आहे. 

Updated: Apr 30, 2019, 01:54 PM IST
खुशी 'या' अभिनेत्याच्या मुलासह डेब्यू करण्यास इच्छुक

मुंबई : आई-वडिलांनी एक काळ गाजवल्यानंतर त्यांची मुले रूपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू पसरवण्यास सज्ज झाले आहेत. गत वर्षी हरहुन्नरी अभिनेत्री श्रीदेवींच्या लाडक्या मुलीने 'धडक' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर सारा अली खानने बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री केली. आता खुशी कपूर म्हाणजे जान्हवी कपूरची लहान बहीण खुशी कपूर मोठ्या पडद्यावर आपली अदाकारी दाखवण्यास सज्ज झाली आहे. डेब्यू करण्याआधिच तिच्या चाहत्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

खुशी बॉलिवूडमध्ये 'बादशाह' चित्रपटाच्या माध्यमातून डेब्यू करणार असल्याच्या चर्चांना उधान आले होते. बॉलिवूड किड्सचा गॅडफादर करण जोहरने अनेक नवीन कलाकारांना मनोरंजन क्षेत्रात उत्तम संधी दिली आहे. काही दिवसांपूर्वी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि खुशी एकत्र झळकणार असल्याचे समोर येत होते. पण नुकताच नेहाच्या 'बीएफएफ्स विद वोग सीजन 3' कार्यक्रमात खुशी आपली बहिण जान्हवी कपूरसह उपस्थित होती. तेव्हा खुशीने एक महत्वपूर्ण खुलासा केला आहे. 

बॉलिवूडमध्ये कोणासह डेब्यू करायला आवडेल? असा प्रश्न नेहाने खुशीला विचारला त्यामध्ये शहरूख खानचा मुलगा आर्यन खान, चंकी पांडेचा भाचा अहान पांडे आणि जावेद जाफरीचा मुलगा मजान जाफरी यांच्या नावांना प्रधान्य देण्यात आले होते. तर खुशीने चंकी पांडेचा भाचा अहान पांडेची निवड केली. त्याचप्रमाणे जर वडिलांना हे मान्य नसल्यास मी त्यांना पटवून देईन, असे वक्तव्य बोनी कपूर यांच्या लाडक्या खुशीने केले आहे.