मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. तिच्या चित्रपट आणि लूकशिवाय, आजकाल अभिनेत्री तिच्या विधानांमुळे देखील चर्चेत आहे. नुकतीच कबीर सिंग फेम अभिनेत्री एका टॉक शोमध्ये पोहोचली होती. इथे मोजक्याच शब्दात तिने असं काही सांगितलं की, तिचं वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.
खरं तर, अलीकडेच कियाराने एका शोमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री जुही चावलाबद्दल बोलताना तिला आंटी असं संबोधलं. एकतर सिनेक्षेत्रात आंटी हा शब्द वापरणंही चुकीचं मानलं जातं. कोणत्याही अभिनेत्रीला आंटी हा शब्द वापरल्यावर राग येतो. असंच काहीसं जुही चावला यांच्यासोबत घडलं.
कियाराने जुही चावलाला आंटी का म्हटलं असं विचारलं असता, यावर अभिनेत्रीने उत्तर देत म्हटलं की, "हे ऐकल्यानंतर त्या मला मारतील असं मला वाटत नाही." बॉलीवूडच्या कॉरिडॉरमध्ये अनेकदा अशा बातम्या येतात की, एखाद्या तरुण अभिनेत्रीने आपल्या ज्येष्ठ अभिनेत्रीसाठी आंटी हा शब्द वापरला तर मोठा गोंधळ उडतो. मात्र, इथल्या गोष्टीत जरा वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळाला.
कियारा अडवाणीने सांगितलं की, "माझ्या आजोबांचे भाऊ सईद जाफरी होते. तर दुसरीकडे 'माझी आजी अशोक कुमार यांची मुलगी होती'. जेव्हा मी माझ्या आई-वडिलांना सांगितलं की, मला चित्रपटात करिअर करायचं आहे. तेव्हा त्यांनी मला हळूहळू मला सईद जाफरी यांच्याबद्दल सांगायला सुरुवात केली. दुःखद बाब ही आहे की, मी कधी सईद जाफरी आणि अशोक कुमार यांना कधीच भेटले नाही. मला कधीच फिल्म स्टोरी बिजनेस बद्दल सांगितलं गेलं नाही.
कियारा पुढे म्हणाली की, माझे आई-वडील लहानपणापासून दोन अभिनेत्यांशी परिचित होते. ज्यांना मी कधीच भेटले नाही... जुही आंटीला वगळता, जी माझ्या वडिलांची बालपणीची मैत्रिण आहे. याला उत्तर देतं जेनिस म्हणाली, "तुम्ही तिला जूही आंटी का म्हणालात!" प्रत्युत्तरात कियारा म्हणाली, "मला वाटत नाही की त्या मला मारतील. मात्र, या सगळ्यावर अद्यापतरी जुही चावलाने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.