सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्यावर कियारा अडवाणीचा मोठा खुलासा

कियारा तिच्या आगामी 'शेरशाह' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Updated: Aug 6, 2021, 07:11 PM IST
सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्यावर कियारा अडवाणीचा मोठा खुलासा

मुंबई : 'कबीर सिंह' चित्रपटातून प्रेक्षकांकडून, चित्रपट समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवलेली अभिनेत्री कियारा अडवाणी या दिवसात प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाची कायम निवड आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने इंडस्ट्रीमध्ये आपली 7 वर्षे पूर्ण केली आहेत. आजकाल कियारा तिच्या आगामी 'शेरशाह' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, जो प्रेक्षकांना खूप आवडला आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर 12 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​शेरशाह चित्रपटात विक्रम बत्राची भूमिका साकारत आहे, तर कियारा त्याच्या मंगेतर डिंपल चीमाची भूमिका साकारत आहे. लोकांना दोघांना एकत्र पाहायला आवडतं आणि सध्याच्या काळातील ही जोडी सर्वात लोकप्रिय जोडी आहे.

एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्याबद्दल उघडपणे बोलली. जेव्हा तिला सिद्धार्थसोबतच्या तिच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिने स्पष्ट केलं की, सिद्धार्थ तिच्यासाठी खूप खास आहे आणि तो तिच्या जवळच्या मित्रापैंकी एक आहे. कियारा पुढे म्हणाली की, कलाकार म्हणून सिद्धार्थ खूप नियंत्रित आणि फोकस आहे. अभिनेत्रीने असंही म्हटलं की, तिला सिद्धार्थसोबत असताना खूप छान वाटतं. त्याच्यासोबतचा प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला असतो.