कियारा आडवाणीच्या हॉट व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

कियाराच्या त्या व्हिडीओने इंटरनेट तापलं  

Updated: Jan 18, 2022, 03:34 PM IST
कियारा आडवाणीच्या हॉट व्हिडीओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ title=

मुंबई : अभिनेत्री कियारा आडवाणी आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे. कियारा तिच्या चित्रपटांमुळे तर चर्चेत असतेचं, पण ती सध्या अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत असलेल्या नात्यामुळे तुफान चर्चेत आहे. दोघांना अनेकदा पार्टी करताना, एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेताना स्पॉट केलं जात. आता देखील कियाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ती समुद्र किनारी बिकिनीत दिसत आहे. बिकिनीतील तिच्या हॉट अदांनी चाहते देखील हैराण झाले आहे. व्हिडीओमध्ये कियारा वेग-वेगळ्या पोज देताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

कियाराच्या हॉट व्हिडीओवर आतापर्यंत 6 लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाईक्स आणि कमेन्ट केल्या आहेत. कियाराच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती अनीस बज्मी दिग्दर्शित हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे.

चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यनसोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या 'भुल भुलैया' चित्रपटाचा सिक्वेल आहे.