त्या टॉपलेस फोटोबद्दल Kiara Advani सोडलं मौन; म्हणाली 'माझ्यासाठी तो एक....'

अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या तिच्या 'शेरशाह' चित्रपटामुळे तुफान चर्चेत आहे.  

Updated: Aug 26, 2021, 08:44 AM IST
त्या टॉपलेस फोटोबद्दल Kiara Advani सोडलं मौन; म्हणाली 'माझ्यासाठी तो एक....'

मुंबई : अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या तिच्या 'शेरशाह' चित्रपटामुळे तुफान चर्चेत आहे. 'कबिर सिंग' चित्रपटानंतर 'शेरशाह' चित्रपटामुळे कियाराच्या करियरला एक वेगळी दिशा मिळाली आहे. अभिनयात तरबेज असलेली कियारा आता तिच्या बोल्डनेसमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी कियारा सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानीसाठी टॉपलेस झाली होती. जेव्हा कियाराचा टॉपलेस फोटो व्हायरल झाला तेव्हा तिला ट्रोल करण्यात आलं. आता दोन वर्षांनंतर ती या फोटोवर व्यक्त झाली आहे. 

डब्बूच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केलेल्या फोटोमध्ये कियारा एका झाडामागे उभी राहून पोज देत होती. कियाराच्या टॉपलेसमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली. याबद्दल कदाचित एवढा विचार डब्बू आणि कियारानेही केला नसेल. जेवढ्या लोकांनी कियाराच्या या फोटोवर पसंती दर्शविली त्यापेक्षा जास्त लोकांनी तिच्या फोटोवर टीका केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फोटोबद्दल काय म्हणली कियारा?
अभिनेता अरबाज खानच्या 'पिंच 2' मध्ये कियारा उपस्थित होती. अरबाजने शोमध्ये कियाराला काही कमेन्ट वाचून दाखवले. त्यामध्ये एक कमेन्ट, '2020मध्ये तिच एक गोष्ट चांगली होती...' यावर कियारा म्हणाली, 'माझ्यासाठी ही गोष्च कौतुकास्पद आहे..' त्यानंतर एका ट्रोलरने 'जर पान बकरीने खाल्ल असतं...' ट्रोलरच्या या कमेन्टवर मात्र कियारा भडकली.