या प्रसिद्ध टीव्ही अॅक्टरने स्वत:च केले जुळ्या मुलांचे जायवळ

टीव्हीवरील प्रसिद्ध चॉकलेट अॅक्टर किंशुक महाजन सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच किंशुक जुळ्या मुलांचा बाबा बनला. 

Updated: Apr 16, 2018, 01:02 PM IST
या प्रसिद्ध टीव्ही अॅक्टरने स्वत:च केले जुळ्या मुलांचे जायवळ title=

मुंबई : टीव्हीवरील प्रसिद्ध चॉकलेट अॅक्टर किंशुक महाजन सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच किंशुक जुळ्या मुलांचा बाबा बनला. किंशुकने आपल्या जुळ्या मुलांच्या जायवळाचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेत. तसेच व्हिडीओही शेअर केलाय. या व्हिडीओची खास गोष्ट अशी की किंशुकने स्वत: या मुलांचे जायवळ केलेय. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होतोय.

किंशुकने आपल्या दोन मुलांचा फोटो शेअर करताना म्हटलंय, माझे दोन अनमोल रत्न...

 

Meri 'ganju' nanhi pari Ssahir Saishaa's Mundan Ceremony. 14.04.2018 @ssahirnsaishaa @divy1721

A post shared by Kinshuk Mahajan (@mahajankinshuk17) on

 

Mere do anmol ratan

A post shared by Kinshuk Mahajan (@mahajankinshuk17) on

 

यासोबतच किंशुकने आपला मुलांचे जायवळ करतानाचा व्हिडीओही शेअर केलाय. ते पोस्ट करताना त्याने लिहिलंय, मुंडन सेरेमनी.

किंशुकने आपल्या दोन्ही मुलांचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. गेल्या ७ ऑक्टोबरला किंशुकच्या पत्नीने जुळ्या मुलांना जन्म दिला. २०११मध्ये किंशुकने दिव्याशी लग्न केले. दोघंही लहानपणीचे मित्र आहेत.