Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : शहनाज गिल आणि पलक तिवारीचं मांजरीच्या मास्कमध्ये बिल्ली बिल्ली, 2nd March हा खास

Salman Khan : ट्वीटरवर मांजरीच्या मास्कमध्ये बिल्ली बिल्ली करताना शहनाज गिल, जस्सी गिल, पलक तिवारीसह अनेक कलाकार दिसतं आहेत. त्यातही ट्वीटरवर 2nd March ट्रेंडमध्ये आहे. नेमकं काय होणार आहे यादिवशी आणि या कलाकारांनी मांजरीचं मास्क का घातलं आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल...

Updated: Mar 1, 2023, 10:42 AM IST
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : शहनाज गिल आणि पलक तिवारीचं मांजरीच्या मास्कमध्ये बिल्ली बिल्ली, 2nd March हा खास  title=
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Salman Khan shehnaaz gill palak tiwari billi billi in cat masks 2nd March Trending on Twitter in marathi

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Video : सोशल मीडियावर कधी कुठला ट्रेंड येईल याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर 2nd March ट्रेंडिंगमध्ये आहे. अनेक यूजर्सला प्रश्न पडला आहे की, यामागे नेमकं कारण तरी काय आहे. याशिवाय शहनाज गिल (shehnaaz gill), जस्सी गिल, पलक तिवारीसह (palak tiwari) अनेक कलाकार मांजरीच्या मास्कमध्ये दिसतं आहे. त्यामुळे अचानक सोशल मीडियावर हा कुठला ट्रेंड (Social Media Trends) आला आहे, हे पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. तर थांबा आम्ही तुम्हाला सांगतो की या सगळ्यांमागचं कारण काय आहे ते...(Trending on Twitter)

मांजरीच्या मास्कमध्ये बिल्ली बिल्ली!

सलमान खान (#SalmanKhan) आणि पूजा हेगडेच्या (Pooja Hegde) बहुप्रतिक्षित चित्रपट किसी का भाई किसी की जान याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 2nd March हा दिवस या चित्रपटासाठी खूप खास आहे. कारण या चित्रपटाचं एक गाणं रिलीज होणार आहे. त्यामुळे सलमान खासने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर या गाण्याची घोषणा केली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

त्यानंतर चित्रपटातील इतर कलाकारांनी मांजरीचा मास्क घालून रील्स, व्हिडीओ आणि फोटो शेअर करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सोशल मीडियावर #SalmanKhan आणि 2nd March ट्रेंडिंगमध्ये आहे. (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Salman Khan shehnaaz gill palak tiwari billi billi in cat masks 2nd March Trending on Twitter in marathi )

शहनाज आणि पलकचे चाहते उत्सुक

शहनाज गिल आणि पलक तिवारी या दोघांचा हा पहिला चित्रपट आहे. सोशल मीडियावर त्यांचा मोठ्या चाहत्या वर्ग आहे. या चित्रपटासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 

या दोघींशिवाय या चित्रपटात जस्सी गिल (Jassi Gill) , भूमिका चावला (Bhumika Chawla), व्यंकटेश दग्गुबती (Venkatesh Daggubati), जगप्ती बाबू (Jagapti Babu), विजेंद्र सिंग (Vijendra Singh), अभिमन्यू सिंग (Abhimanyu Singh) , राघव जुयाल (Raghav Juyal), सिद्धार्थ निगम (Siddharth Nigam) आणि विनाली भटनागर (Vinali Bhatnagar) दिसणार आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

या सगळ्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर रील्स शेअर करत, कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "तयार आहात आमच्या पुढच्या गाण्यासाठी? 2 मार्चला 'बिल्ली बिल्ली'साठी सज्ज व्हा #KisiKaBhaiKisiKiJaan."

या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर बिली बिल्ली हे गाणे सुखबीरने गायले आहे. तर  अॅक्शन, मनोरंजन आणि रोमान्सने भरलेला हा चित्रपट किसी का भाई किसी की जान 2023 च्या ईदला रिलीज होणार आहे.