केएल राहुलकडून सुनिल शेट्टीच्या मुलीची फसवणूक?

काही दिवसांपूर्वी, केएल राहुलने एका अभिनेत्रीच्या फोटोवर कमेंट केली आहे. त्यानंतर चाहते त्याच्यावर चिडले आहेत. 

Updated: Aug 15, 2021, 08:21 AM IST
केएल राहुलकडून सुनिल शेट्टीच्या मुलीची फसवणूक? title=

मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुलने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंडच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावून नवा रेकॉर्ड केला आहे. केएल राहुलच्या या खेळीनंतर त्याची कथित प्रेयसी अथिया शेट्टीचे वडील आणि बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते सुनील शेट्टी यांनीही त्याचे अभिनंदन केले.

केएल राहुल आणि त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टी यांच्या अफेअरच्या बातम्या अनेकदा चर्चेत असतात. दोन्ही सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया पोस्टवरुन बऱ्याचदा त्यांची बॉण्डींग दिसून येते. त्यात सुनील शेट्टीने केएल राहुलसाठी केलेल्या ट्विटमुळे चाहत्यांना अथिया आणि केएल एकत्र असल्याची बातमी कन्फर्म झाली.

काही दिवसांपूर्वी, केएल राहुलने एका अभिनेत्रीच्या फोटोवर कमेंट केली आहे. त्यानंतर चाहते त्याच्यावर चिडले आहेत. पंजाबी अभिनेत्री आणि मॉडेल सोनम बाजवा हिने तिच्या इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. फोटो पोस्ट करताना सोनम बाजवाने लिहिले, 'सूर्य मावळत आहे आणि मी तुझ्या विचाराता आहे.' या फोटोसोबत सोनम बाजवाने हार्ट इमोजी देखील पोस्ट केले. या पोस्टची दखल घेत केएल राहुल यांनी लिहिले, 'फक्त एक कॉल दूर'.

केएल राहुल ने अशी कमेंट करताच केएल राहुल आणि सोनम बाजवा हे एकमेकांना डेट करत आहेत का अशी एकच चर्चा सुरु झाली. जर केएल राहुल आणि सोनम एकत्र असतील तर , तो सुनिल शेट्टीची लेक अथिया शेट्टीची फसवणूक करतोय का असा ही प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. 
सोशल मीडियावर याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे.चाहत्यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुलसोबत सध्या इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंड दौऱ्यावर हे जोडपे एकत्र दिसले आहे. केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी अनेकदा त्यांच्या नात्याबद्दल चर्चेत असतात.