'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील सोनू बॉडी शेमिंगची शिकार

'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या 13 वर्षांपासून लोकांची मने जिंकत आहे. 

Updated: Aug 14, 2021, 10:49 PM IST
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील सोनू बॉडी शेमिंगची शिकार title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या 13 वर्षांपासून लोकांची मने जिंकत आहे. तारक मेहताचं प्रत्येक पात्र लोकांना आपलं वाटू लागलं आहे. या शोमध्ये सोनू आत्माराम भिडे हे देखील एक अतिशय महत्त्वाचं पात्र आहे. तारक मेहताच्या टप्पू सेनेची प्रमुख सदस्य म्हणून तिला चांगलीच पसंती मिळाली आहे. हे पात्र साकारून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री झील मेहता यांना बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे. या वाईट अनुभवाबद्दल तिने आपलं मौन तोडलं आहे.

सोशल मीडियावर सांगितली कहाणी
अभिनेत्री झील मेहताने अलीकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती तिच्या शरीराबद्दल होणाऱ्या अश्लील कमेंटबद्दल बोलताना दिसली आहे. तिने इन्स्टाग्रामवर सांगितलं की, तिला सांगितलं जातं की, तिला 'ती मेनटेन नाही' किंवा 'खूप उंच' नाही. एवढंच नाही तर तिने या व्हिडिओमध्ये बरंच काही सांगितलं आहे. 

दात आणि मुरुमांवर कमेंट
या व्हिडिओमध्ये ती पुढे म्हणाली की, लोकांनी तिच्या दातांच्या आकारावर कमेंट केली आणि तिच्या मेकअपवर विनोद केले आहेत. त्याचवेळी, काहींनी तिला तिचा पिंपल्स घालवण्याचा सल्ला दिला आहे. रीलच्या सुरुवातीच्या भागात, झीलने ऑफ शोल्डर टॉप घातलेला दिसतो. दुस-या क्लिपमध्ये ती सहजपणे तिचा नो-मेकअप त्वचा आणि साधे कपड्यामध्ये करताना दिसते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कॅप्शनमध्ये लिहिलेली हृदयस्पर्शी गोष्ट
तिने या पोस्टला कॅप्शन दिलं आहे, 'माझी इच्छा आहे की, मी लहान वयात @avantinagraral चं हे गाणं ऐकले असतं तर. मला स्वतःला खरोखर हे सगळं स्वीकारण्यास आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि मी कशी आहे हे समजून घेण्यास मला जास्त काही मेहनत घ्यावी लागली नसती. मला ते आवडलं आणि ते मी स्वीकारलं. मी कोण आहे, इतर लोकं काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही. 'जर तुम्ही हे वाचलं, तर तुम्ही तुमच्या मित्राला सांगा की तुम्हाला वाटतं की तुम्ही सुंदर, स्मार्ट आणि दयाळू आहात,' 'मला खात्री आहे की ते तुमचं नक्की कौतुक करतील.'