Celebrity Chef Suresh Pillai: संघर्ष हा कुणालाच चुकलेला नाही. त्यामुळे आपल्यापैंकी प्रत्येकालाच आपापल्या परीनं संघर्ष हा करावाच लागतो. आपण कायमच पाहतो वाचतो की बॉलिवूडच्या सेलिब्रेटींना कायमच मोठा संघर्ष करावा लागतो. परंतु असं नसून हा संघर्ष प्रत्येक क्षेत्रात करावा लागतो. मेहनत आणि कष्टाचे चीज (Inspirational Story) हे आपल्याला मिळतेच मिळते. त्यामुळे यशस्वी माणसांच्या स्टोरीज या अशाच काहीतरी आगळ्यावेगळ्या आणि प्रत्येकालाच (Suresh Pillai) प्रेरणा देणाऱ्या असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सेफ बद्दल सांगणार आहोत ज्यांनी एकेकाळी त्यांच्या वयाच्या 18 व्या वर्षी केटरिंग सर्व्हिसींग बॉय म्हणून काम पाहिले होते. पण आज ते सुप्रसिद्ध शेफ आहेत. त्यांच्याबद्दलच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
त्यांनी याबद्दल स्वत:हून खुलासा केला आहे. इन्टाग्रामवर त्यांनी अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी आपला एक जूना फोटो शेअर केला असून यावेळी त्यांनी आपल्या संघर्षाबद्दल लहिले आहे.
या सेलिब्रेटी शेफचं नावं आहे शेफ सुरेश पिल्लई. ते आज सुप्रसिद्ध शेफ आहेत. त्यांचे इन्टाग्रामवरही लाखो फॉलोवर्स आहेत. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय की, ''हा फोटोत दिसणार मुलगा मी आहे. कधी काळी एका मी कार्यक्रमात केटरिगं सर्व्हिस बॉय म्हणून काम पाहायचो. आज तुम्ही ज्या सुरेश पिल्लई यांना ओळखता तो मी 18 वर्षांचा होता तेव्हा असा दिसायचो. मी सातवी-आठवीच्या वर्गात होतो तेव्हा मी माझा बिझनेस सुरू केला होता. मी एक व्यवसायिक आहे आण त्याचा मला गर्व आहे. माझ्या घरी पामेलोचं खूप मोठं झाड होतं.''
हेही वाचा - ''बीचवर बिकीनी घालणं कॉमन नाही का?...''; सीतेची भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा बोचरा सवाल
''ते माझं बालपणीचं सर्वात आवडतं फळ त्यातून मला खायला मिळायचं. मी पहाटे 5 वाजता उठायचो आणि नाश्त्याच्या वेळी ते फळ खायला जायचो. मग हेच फळ माझ्या पॉकेट मनीचं साधन बनलं. आणि मग मी हे फळ बाजारात 25 रूपयांना विकायचो. तेव्हा मी माझ्या मित्रांना एक-दोन रूपयांची नोट दाखवचोय तेव्हा समजून घ्या की माझा आनंद किती असेल. त्याचसोबत मी मंदिरात जेव्हा उत्सव असायचा तेव्हा मी शेंगदाणे विकायचो.''
ते पुढे म्हणाले की, ''मी माझ्या तारूण्यात एक हॉटेलचा वेटरही होतो. मी एक कॅटरींग बॉयपण होतो. मी मंदिराच्या भोजनालयामध्ये एक क्लिनरही होतो. आज मी जो कोणी आहे तो फक्त माझ्या आयुष्यात आलेल्या अनुभवांमुळे. आपल्या यशाची स्वप्न ही पाहायलाच हवीत परंतु आपल्याला प्रयत्न केल्याशिवाय काहीच पर्याय नाही.'' यावेळी त्यांच्या 'या' पोस्टवर चाहत्यांच्या विविध कमेंट्सही आल्या आहेत.