टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ म्हणाली या दोघांच्या नात्यावर मी...

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे दोघंही बर्‍याचदा डिनरसाठी किंवा लंचसाठी एकत्र जाताना दिसतात.

Updated: Jul 10, 2021, 09:46 PM IST
टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ म्हणाली या दोघांच्या नात्यावर मी...

मुंबई : टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्यातील नात्याविषयीच्या बातम्या रोजच येत असतात. हे दोघंही बर्‍याचदा डिनरसाठी किंवा लंचसाठी एकत्र जाताना दिसतात. पण कधीही हे दोघंही त्यांच्या नात्याला दुजोरा देत नाहीत. टायगर आणि दिशा नेहमीच एकमेकांचे चांगले मित्र आहेत. पण यावेळी टायगरची बहीण कृष्णाने दिशा पटानीशी असलेल्या टायगरच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. कृष्णाने एका मुलाखतीत सांगितलं आहे की, जेव्हा दिशा आणि टायगर एकत्र असतात तेव्हा कुणालाही कंटाळा येत नाही.

कृष्णा आणि दिशा एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. या दोघींही सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात आणि एकमेकांच्या पोस्टवर मजेदार कमेंट्सदेखील करतात. इतकंच नव्हे तर दोघंही एकत्र वेळ घालवताना बर्‍याचदा स्पॉट झाल्या आहेत. अलीकडेच कृष्णाने भाऊ टायगरसोबत दिशाचा वाढदिवस साजरा केला.

एक मुलाखतीमध्ये टायशाच्या नात्याबद्दल बोलताना कृष्णा म्हणाली, जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा मजा येते आणि आम्ही खूप हसतो. त्यावेळी कोणतेही गंभीर आणि कंटाळवाणे क्षण नसतात. मला वाटतं की हे छान आहे. मला आनंद आहे की, माझ्या भावाची कोणीतरी जिवलग, जवळची मैत्रिण आहे ज्यामुळे मला त्यांना आनंदी पाहून आनंद होतो. तो तिच्याबरोबर खूश आहे. कारण त्यांच्या इंडस्ट्रीत हे खूप कठीण काळ आहे.

भाऊ खुश तर मी पण खुश
कृष्णा पुढे म्हणाली की, मला असं वाटतं की जोपर्यंत टायगर आणि दिशा आनंदी आहेत तोपर्यंत ते नेहमी हसत राहतील. आम्ही एकत्र चांगला वेळ घालवतो. मला नेहमी माझा भाऊ खुश असणं गरजेचं आहे. जर तो आनंदी असेल तर मी पण आनंदी आहे.