तो 1 तास ज्यामुळे वाचू शकला असता KK चा जीव, कॅन्सर्टमध्येच मिळाले संकेत

वयाच्या ५३ व्या वर्षी आणि अतिशय तंदुरुस्त दिसणाऱ्या के.के.चा जीवनापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास अवघ्या 2 तासात पूर्ण झाला.

Updated: Jun 1, 2022, 10:27 PM IST
तो 1 तास ज्यामुळे वाचू शकला असता KK चा जीव, कॅन्सर्टमध्येच मिळाले संकेत title=

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (krishnakumar kunnath) म्हणजेच KK यांचे मंगळवारी रात्री कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. केके हा 53 वर्षांचा होता आणि तो दिसायला एकदम फिट दिसत होता. पण लाइव्ह कॉन्सर्टमध्ये तासाभराच्या परफॉर्मन्सनंतर त्याच्यासोबत असे काय घडले की, ज्यामुळे केकेचा अचानक जीव गेला. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच केकेचा मृत्यू झाला होता.

कोलकाता येथे आयोजित एका कॉन्सर्टमध्ये के.के. ने सुमारे तासभर चाहत्यांसाठी त्यांच्या आवडती गाणी गायली आणि त्यानंतर हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर त्याची प्रकृती खालावली.

वयाच्या ५३ व्या वर्षी आणि अतिशय तंदुरुस्त दिसणाऱ्या के.के.चा जीवनापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास अवघ्या 2 तासात पूर्ण झाला.

कोलकाता येथील गुरुदास कॉलेजच्या नझरुल मंच सेमिनार हॉलमध्ये के.के. संध्याकाळी 6.10 वाजता तो स्टेजवर पोहोचला, त्यावेळी हॉल संपूर्ण क्षमतेने खचाखच भरला होता. हॉलमध्ये २४८२ लोकांची बसण्याची जागा होती मात्र ७ हजारांहून अधिक लोक तिथे उपस्थित होते आणि सगळेच लोक के.के. चा परफॉर्म पाहण्यासाठी उत्सुक होते.

असे सांगितले जाते की, के.के. जेव्हा स्टेजवर आला तेव्हा गाताना तो वारंवार घाम पुसत होता. या दरम्यान, तो स्टेज सोडून विश्रांती घेण्यासाठी मागे देखील गेला. त्यावेळी अनेक ठिकाणी केकेच्या आवाजावरून त्याला गाताना त्रास होत असल्याचे देखील दिसून येते.

रात्री 8.40 नंतर म्हणजे कॉन्सर्ट सुरु झाल्यानंतर आपली तब्येत बिघडत चालली आहे असे के.के. ला संकेत देखील मिळाले मात्र त्यांच्याकडे त्याने लक्ष दिले नाही.

यानंतर केके हॉटेल ग्रँडला गेला आणि हा हॉटेल गुरुदास कॉलेजपासून 6 किलोमीटरवर आहे. हॉटेलपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 20 मिनिटे लागतात. रात्री नऊनंतर केके हॉटेलवर पोहोचला.

असे देखील सांगितले जात आहे की, के.के. खोलीत प्रवेश करताना सोफ्यावरून पडला, यादरम्यान त्याच्या कपाळाला आणि ओठांना दुखापत झाली. रात्री 10.15 वाजता के सीएमआरआय रुग्णालयात नेण्यात आले आणि हे ठिकाण कोलकाता येथील ग्रँड हॉटेलपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे.

इथपर्यंत पोहोचण्यासाठी 15 ते 20 मिनिटेही लागतात. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही त्यांच्यावर उपचार करू शकलो नाही हे दुर्दैव आहे.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर जितक्या लवकर कोणी हॉस्पिटलमध्ये पोहोचेल तितकी त्याची वाचण्याची शक्यता जास्त आहे. डॉक्टर या पहिल्या तासाला गोल्डन अवर म्हणतात.

केकेच्या बाबतीत, कॉन्सर्ट हॉल ते हॉटेल आणि हॉटेल ते हॉस्पिटलमध्ये जाण्यात एक तास वाया गेला. त्यामुळे जर के.के. थेट हॉस्पिटलमध्ये गेला असता, आज तो आपल्यासोबत असता.