नवा दिवस नवा वाद; लैंगिक शोषणाच्या आरोपात फसला KRK

सतत वादात असणारा अभिनेता आणि फिल्म क्रिटिक KRK म्हणजेच कमल आर खान सतत काहींना काही बरळत असतो. वाद निर्माण करत असतो .

Updated: Sep 5, 2022, 11:37 AM IST
नवा दिवस नवा वाद; लैंगिक शोषणाच्या आरोपात फसला KRK title=

Kamal R Khan Arrested: सतत वादात असणारा अभिनेता आणि फिल्म क्रिटिक KRK म्हणजेच कमल आर खान सतत काहींना काही बरळत असतो. वाद निर्माण करत असतो .

पण यावेळी त्याच्याच अंगलट आलाय.वर्सोवा पोलिसांनी कमल आर खान ला अटक केली आहे.तीन वर्ष जुन्या प्रकरणाच्या वादावरून त्याला अटक झाली आहे . 

केआरके वर लैंगिक शोषणाचा आरोप लागवण्यात आला आहे आणखी महत्वच म्हणजे याआधी  त्याला अटक झालीये ते आणखी एका वेगळ्या प्रकरणात.

2020 मध्ये इरफान खान(irfan khan) आणि ऋषी कपूर(rishi kapoor) यांच्या निधनानंतर अभिनेत्याने काही वादग्रस्त ट्विट केले होते बोरिवली 25 एमएम न्यायालयाच्या बदलीच्या आदेशानंतर केआरकेवर ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी केआरकेला वांद्रे न्यायालयात हजर केले, जिथे त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केआरके त्याच्या ट्विट आणि वक्तव्यांमुळे अनेकदा वादात सापडला आहे.