आज 5 लाखांचे बूट घालतो कृष्णा अभिषेक; पण कधीकाळी चोरायचा मामा गोविंदाचे कपडे

Krushna Abhishek - Govinda : कृष्णा अभिषेक कधी चोरायचा गोविंदाचे कपडे आज घालतो 5 लाख रुपयांचे बूट

दिक्षा पाटील | Updated: Jan 4, 2025, 02:36 PM IST
आज 5 लाखांचे बूट घालतो कृष्णा अभिषेक; पण कधीकाळी चोरायचा मामा गोविंदाचे कपडे title=
(Photo Credit : Social Media)

Krushna Abhishek - Govinda : लोकप्रिय कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि त्याचे मामा गोविंदामध्ये सात वर्षे दुरावा आला होता. या काळात ते एकमेकांशी बोलतही नव्हते. त्यांच्यात खूप मोठं भांडण झालं त्यांचं हे भांडण चर्चेचा विषय ठरला. पण आता दोघांचा पॅचअप झाला आहे. सात वर्षांनंतर गोविंदा आणि कृष्णा अभिषेक एकत्र 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये दिसले. आता अर्चनानं गोविंदाच्या एपिसोडचा एक BTS व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात कृष्णानं गोविंदाविषयी एक मोठा खुलासा केला आहे. कृष्णानं सांगितलं की तो गोविंदाचे कपडे चोरायचा. 

अर्चना पूरन सिंगच्या व्हिडीओमध्ये कृष्णा अभिषेक बोलताना दिसतोय की त्याचा सात वर्षांचा वनवास हा आता पूर्ण झाला आहे. या आधी मामासोबत 10 वर्षांपूर्वी 'कॉमेडी सर्कस' मध्ये परफॉर्म केलं होतं. कृष्णानं मामा गोविंदासोबत झालेल्या 'भरत मिलाप' विषयी सांगितलं. 'आम्ही अशा प्रकारे एकत्र आलो आहोत की खूप मज्जा आली. हे सगळ्यात चांगले क्षण होते. आज  अ‍ॅक्ट संपल्यानंतर ते मला ओरडले. पण ते मला ओरडू शकतात कारण ते माझे मामा आहेत. ते काहीही करू शकतात.'  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

कृष्णा अभिषेकनं पुढे सांगितलं की मी मामाच्या अनेक गोष्टी चोरल्या आहेत आणि त्यांना त्याविषयी काही माहित नाही. कृष्णानं सांगितल्याप्रमाणे, गोविंदा कधी-कधी त्याचे कपडे कृष्णाला द्यायचे आणि जर दिले नाही तर कृष्णा चोरून घ्यायचा. 

कृष्णाच्या म्हणण्यानुसार, गोविंदानं त्याच्या गाण्यांमध्ये डे कपडे परिधान केले आहेत. ते सगळे त्याच्याकडे आहेत. याविषयी सांगत कृष्णा म्हणाला, 'मामाकडे खूप कपडे आहेत, त्यामुळे त्याला कसं कळलं असतं? मी रात्री त्यांचं कपाट उघडायचो आणि शर्ट काढून घ्यायचो. चोरल्यानंतर पूर्ण आत्मविश्वासानं तेच शर्ट घालून मी त्यांच्यासमोर जायचो इतकंच नाही तर त्यांना हे कळतच नव्हतं.' 

हेही वाचा : 'मला आई आवडायची, मुलगी नाही'; राम गोपाल वर्माने केलं उघड, म्हणाला 'मी कधीही जान्हवीसोबत...'

दरम्यान, एकदा कृष्णा अभिषेकला गोविंदानं पकडलं होतं. त्यानं गोविंदाचा तो शर्ट परिधान केला होतो जो त्यानं त्याच्या एका चित्रपटात परिधान केला होता. त्या शर्टमध्ये गोविंदाचे काही शॉट्स होते. गोविंदानं कृष्णाला पाहिलं आणि विचारलं की 'तुला हे शर्ट कुठून मिळालं? त्यावर कृष्णानं उत्तर दिलं की तुम्हीच मला हे दिलं.' त्यानंतर गोविंदा म्हणाला की 'असं शक्यच नाही.' तेव्हाच स्पॉट बॉय आले आणि म्हणाले 'की सर हे शर्ट परिधान करणार आहेत, त्या शॉट्समध्ये पाहिजे.'