'करण जोहरला मीच लाँच केलं!' शाहरुख खानचा मोठा गौप्यस्फोट, नेमकं का असं म्हणाला किंग खान?

चाहते चित्रपटाचा आनंद घेत असतानाच शाहरुख खान आणि राणी मुखर्जीने तिथे हजेरी लावली.  स्पेशल स्क्रिनिंगमध्ये किंग खानने चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलं. 

Updated: Oct 16, 2023, 03:12 PM IST
'करण जोहरला मीच लाँच केलं!' शाहरुख खानचा मोठा गौप्यस्फोट, नेमकं का असं म्हणाला किंग खान? title=

मुंबई : 'कुछ कुछ होता है' रिलीज होवून  25 वर्षे झाली आहेत. अशा परिस्थितीत हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. काजोल, शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांच्या चित्रपटाच्या सक्सेसला सेलिब्रेट करण्यासाठी मुंबईत एका खास स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं.

चाहते चित्रपटाचा आनंद घेत असतानाच शाहरुख खान आणि राणी मुखर्जीने तिथे हजेरी लावली.  स्पेशल स्क्रिनिंगमध्ये किंग खानने चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलं. राणी आणि शाहरुखसोबत करण जोहरही 'कुछ कुछ होता है'च्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये दिसला होता.

शाहरुख खान करणला आपला मित्र मानत नाही
स्क्रिनिंगदरम्यान शाहरुख खान करण जोहरबद्दल बोलला. यावेळी बोलताना शाहरुख खान म्हणाला, 'लोकांना वाटतं की मी आणि करण जोहर मित्र आहोत. पण, करण माझ्या मित्राचा मुलगा आहे. खरं तर मी आणि करणचे वडील यश जोहर मित्र होतो. त्यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली होती.'' शाहरुख खान पुढे म्हणाला, ''कुछ कुछ होता है माझ्या सगळ्यात जवळचा सिनेमा आहे.

हा माझा खूप खास चित्रपट आहे. या चित्रपटावर काम सुरू झालं तेव्हा करण 23 वर्षांचा होता. आता माझा मुलगा आर्यन 23 वर्षांचा आहे. जेव्हा मी मागे वळून पाहिलं तेव्हा मला खूप बरं वाटलं. असं दिसतंय की, 23 वर्षांपूर्वी मी माझ्या मुलाला लॉन्च केलं. कारण त्यावेळी करण इंडस्ट्रीत नवीन होता आणि त्याच्याआधी मी इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली होती

स्पेशल स्क्रिनिंगमध्ये शाहरुख ब्लॅक टी-शर्टमध्ये दिसला
स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान चित्रपटात टीना मल्होत्राची भूमिका साकारणारी राणी मुखर्जी गुलाबी रंगाच्या साडीत दिसली. तर राहुल खन्नाची भूमिका साकारणारा अभिनेता शाहरुख खानने काळ्या  रंगाचा टी-शर्ट आणि लेदर जॅकेटसह डेनिम्स परिधान केली होती. चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहर काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसला.

'कुछ कुछ होता है' चित्रपटाच्या निर्मात्यांनी शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांनी चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला. हा चित्रपट 1998 नंतर पुन्हा प्रदर्शित झाला. करण जोहर दिग्दर्शित हा चित्रपट आजही सर्वांच्या मनात घर करून आहे. या कार्यक्रमात करण जोहर, शाहरुख खान, राणी मुखर्जी उपस्थित होते.