अभिनेत्रीनं भूमिकेसाठी केलं मुंडन, मग बनली पतीची बहीण; 'या' Reality Show मधून येतेय प्रेक्षकांच्या भेटीला

 कहानी घर घर की, ये वादा रहा, गुप्ता ब्रदर्स, ना बोले तुम ना मैं कुछ कहा, टीव्ही शोमध्ये आपल्या अभिनय कौशल्यामुळे घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू धवन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Updated: Oct 16, 2023, 02:39 PM IST
अभिनेत्रीनं भूमिकेसाठी केलं मुंडन, मग बनली पतीची बहीण; 'या' Reality Show मधून येतेय प्रेक्षकांच्या भेटीला title=

Bigg Boss 17 Contestant Rinku Dhawan : कहानी घर घर की, ये वादा रहा, गुप्ता ब्रदर्स, ना बोले तुम ना मैं कुछ कहा, टीव्ही शोमध्ये आपल्या अभिनय कौशल्यामुळे घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू धवन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रिंकू धवन सर्वात वादग्रस्त आणि लोकप्रिय शो बिग बॉस 17 चा एक भाग बनली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, रिंकू धवन (बिग बॉस) तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफबद्दलही खूप चर्चेत असते.

रिअल लाईफ नवऱ्याची बनली रील लाइफ बहिण
'कहानी घर घर की' या मालिकेतून प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री रिंकू धवन ही अभिनेता किरण कर्माकरची याची ऑनस्क्रीन बहीण बनली. मनोरंजनाच्या बातम्यांनुसार, शो दरम्यान दोन्ही कलाकार चांगले मित्र बनले आणि हळूहळू या दोघांमध्ये प्रेमाचं नातं फुललं. असं म्हटलं जातं की, काही वेळातच या दोन्ही सेलिब्रिटी कपलने लग्न केलं. मात्र, 2017 मध्ये रिंकू धवनने घटस्फोट घेत अभिनेता किरण यांच्यासोबतचं नातं तोडलं.

भूमिकेसाठी मुंडन केलं होतं
रिंकू धवन ही तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. जवळपास दोन दशकांपासून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असलेली अभिनेत्री रिंकू धवन सध्या स्टार प्लसच्या तितली शोमध्ये दिसली होती. आम्ही तुम्हाला सांगतो की, एकदा एका मालिकेतील तिच्या भूमिकेसाठी तिने आपलं मुंडन देखील केलं होतं.

बिग बॉसमध्ये  घालणार धुमाकूळ
सलमान खानच्या बिग बॉस 17 या शोमध्ये रिंकू धवनचा धमाकेदार अवतार पाहायला मिळणार आहे. एकेकाळी तिच्या प्रोफेशनल फ्रंट आणि पर्सनल फ्रंटसाठी चर्चेत असलेली ही पॉवरफुल अभिनेत्री आता बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालताना दिसणार आहे. बिग बॉसच्या १७ व्या सीझनमध्ये रिंकूचा प्रवास किती काळ टिकतो आणि तिचा प्रवास अधिक मजबूत करण्यासाठी ती कोणत्या युक्त्या वापरते हे पाहावं लागेल.