Sana Saeed engaged: 'कुछ कुछ होता है' मधील अंजलीने केला 'या' हॉलिवूड कलाकाराशी साखरपुडा; Video Viral

Sana Saeed is engaged to Csaba Wagner: 'कुछ कुछ होता है' चित्रपटात अंजलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सना सईदने नुकताच साखरपुडा केलाय.

Updated: Jan 1, 2023, 06:00 PM IST
Sana Saeed engaged: 'कुछ कुछ होता है' मधील अंजलीने केला 'या' हॉलिवूड कलाकाराशी साखरपुडा; Video Viral title=
Sana Saeed , Csaba Wagner

Entertainment News: गेल्या तीन दशकात बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) याच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. शाहरूख खानचा सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे 'कुछ कुछ होता है'... चित्रपटात शाहरुख खान याच्याबरोबर मुख्य भूमिकेत असलेल्या काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) यांनाही प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. हा चित्रपट आणखी एका कारणामुळे चर्चेत राहिला तो म्हणजे छोट्या अंजलीमुळे... होय तीच, चित्रपटातील शाहरूखची मुलगी म्हणजे सना सईद (Sana Saeed)

चित्रपटातील या बालकलाकार अंजलीने नवीन वर्षात सर्वांना (New Year Good News) गुडन्यूज दिली आहे. अंजलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सना सईदने (Sana Saeed is engaged to Csaba Wagner) नुकताच साखरपुडा केलाय. तिचा बॉयफ्रेंड आणि साउंड डिझायनर म्हणून काम करणाऱ्या हॉलिवूड कलाकाराशी साबा वॅगनरशी साखरपुडा केला. बॉयफ्रेंडशी लग्न करून सनाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. (Kuch Kuch Hota Hai fame Sana Saeed is engaged to boyfriend Csaba Wagner marathi Entertainment news)

आणखी वाचा - 'कुछ कुछ होता है' मधली छोटी अंजली आठवतेय, आता दिसतेय ग्लॅमरस, पाहा फोटो...

दोघांनी त्यांच्या ऑफिशिअल इन्टाग्राम अकाऊंटवरून (Sana Saeed Instragram) व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावेळी दोघेही भावूक झाल्याचं पहायला मिळतंय. सनाच्या या व्हिडीओवर सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतोय. बॉलिवूडमधील (Bollywood News) अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

पाहा Video - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sana Saeed (@sanaofficial)

दरम्यान, 'कुछ कुछ होता है' या चित्रपटासाठी तब्बल 200 मुलींमधून सना सईदची निवड करण्यात आली होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत सना सईदने या चित्रपटाचं शुटिंग पूर्ण केलं होतं. यानंतर सनाने करण जोहरच्या 'स्टूडंट ऑफ द इयर' (Student Of The Year) या चित्रपटातही काम केलं. या चित्रपटानंतर ती फारशी कोणत्या चित्रपटात दिसली नाही. सनाने मॉडलिंग क्षेत्रात आपलं करियर केलं आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x