'कुछ कुछ होता है' मधली छोटी अंजली आठवतेय, आता दिसतेय ग्लॅमरस, पाहा फोटो...

कुछ कुछ होता है या चित्रपटपटाली बालकलाकर अंजली आता 24 वर्षांनंतर दिसते अशी, फोटो होतायत व्हायरल

Updated: Nov 5, 2022, 10:51 PM IST
'कुछ कुछ होता है' मधली छोटी अंजली आठवतेय, आता दिसतेय ग्लॅमरस, पाहा फोटो...  title=

Entertainment News : बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानने (Shah Rukh Khan) अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर आजही कोरले गेले आहेत. यातलाच एक चित्रपटमध्ये 'कुछ कुछ होता है' (Kuch Kuch Hota Hai). 1998 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट चांगलाच हिट ठरला होता. चित्रपटात शाहरुख खान याच्याबरोबर मुख्य भूमिकेत असलेल्या काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) यांनाही प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. नुकतीच या चित्रपटाला 24 वर्ष पूर्ण झाली. दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) पहिलाच चित्रपट होता. 

चित्रपटातली बाल कलाकर अंजली
शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्याबरोबरच या चित्रपटात असलेली बालकलाकाराची भूमिकाही लोकांना आवडली. चित्रपटात राणी मुखर्जी हिची मुलगी अंजली आजही लोकांच्या लक्षात आहे. या चित्रपटात अंजलीची भूमिका साकारणाऱ्या त्या बालकलाकारचं नाव आहे सना सईद (Sana Saeed). 24 वर्षांनंतर सना सईद आता खूपच ग्लॅमरस झाली आहे. 

'कुछ कुछ होता है' या चित्रपटासाठी तब्बल 200 मुलींमधून सना सईदची निवड करण्यात आली होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत सना सईदने या चित्रपटाचं शुटिंग पूर्ण केलं होतं. यानंतर सनाने करण जोहरच्या 'स्टूडंट ऑफ द इयर' (Student Of The Year) या चित्रपटातही काम केलं. या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली. या चित्रपटात सनाने बिकनी घातली होती, यावरुन तिच्या घरात यावरुन चांगलाच वाद झाला होता. वडिलांनी तिला यावरुन फटकारलंही होतं. या चित्रपटानंतर ती फारशी कोणत्या चित्रपटात दिसली नाही. सनाने मॉडलिंग क्षेत्रात आपलं करियर केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sana Saeed (@sanaofficial)

'कुछ कुछ होता है'  या चित्रपटाच्या आधी तिला 'हम पंछी एक दाल' या चित्रपटाची ऑफर होती, पण तीने ती धुडकावली. स्टार प्लसवरच्या 'फॉक्स किड्स' कार्यक्रमात तीने चतुर चाचीची भूमिका साकारली होती. याशिवाय 'बाबुल का आंगन छुटे ना', 'कॉमेडी सर्कस' आणि लाल इश्क यांसारख्या शोमध्येही काम केलं आहे. 'झलक दिखला जा 6', 'झलक दिखला जा 7', 'नच बलिए 7' आणि 'झलक दिखला जा 9' यासह अनेक रिअॅलिटी शोचा ती भाग होती. 

हे ही वाचा : तीन हजार रुपयांसाठी मुलांना शिकवायची श्वेता बच्चन, अभिषेककडून घेते होती पैसे उधार

अभिनय आणि मॉडलिंग व्यतिरिक्त सनाला व्यायामाची प्रचंड आवड आहे. आपल्या फिटनेसच्या बाबतीत ती चांगलीच जागरुक आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती फिटनेसचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x