मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अमिता उद्गाता यांचे मंगळवारी रात्री उशिरा निधन झाले. अमिता गेल्या दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर मुंबईतील कृतीकेयर रुग्णालयात ४ दिवसांपासून उपचार सुरु होते. त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले. मंगळवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेता. फुफ्फुसे निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. अमिता यांनी अनेक टीव्ही सीरियल्समध्ये काम केलेय. तसेच अनेक नकारात्मक भूमिकाही साकारल्यात.
अमिता यांनी मन की आवाज प्रतिज्ञामध्ये अम्माची भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी महाराणा प्रताप, बाबा ऐसो वर ढूंढो आणि डोली अरमांनो की या सारख्या मालिकांत काम केले होते. त्या कुछ रंग प्यार के ऐसे भी यामध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय त्या थिएटर आर्टिस्टही होत्या. अमिता यांनी १९७९ ते १९९०दरम्यान दूरदर्शनवर काम केले होते. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार होते.
अमिता यांनी बॉलीवूडच्या सिनेमांमध्येही काम केले होते. त्यांनी ऐश्वर्या राय बच्चनच्या सरबजीत आणि परिणीती चोप्राच्या हंसी तो फंसीमध्येही काम केले होते. त्यांची जवळची मैत्रीण आभा परमार यांनी इंडिया टुडेला सांगितले, अमिता माझ्यासाठी बहिणीसारखी होती. मी कानपूरची तर ती लखनऊची. मला माहीत नाही तिची अवस्था अशी आहे. ती चांगली अभिनेत्री आणि मैत्रीण होती.