'मला नोकरीची चिंता नाही, आईच्या सन्मानासाठी...'; कुलविंदर कौरच्या पोस्टमागचं सत्य उघड!

Kulwinder Kaur Post After Slapping Kangana Ranaut : कंगना रणौतला कानशिलात लगावल्यानंतर सोशल मीडियावर कुलविंदर कौरनं शेअर केली पोस्ट? 

दिक्षा पाटील | Updated: Jun 10, 2024, 10:55 AM IST
'मला नोकरीची चिंता नाही, आईच्या सन्मानासाठी...'; कुलविंदर कौरच्या पोस्टमागचं सत्य उघड! title=
(Photo Credit : Social Media)

Kulwinder Kaur Post After Slapping Kangana Ranaut : चंडीगढ विमानतळावर कुलविंदर कौर नावाच्या एका CISF महिला जवाननं बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला कानशिलात लगावली होती. हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदार संघातून विजेती ठरलेल्या कंगना रणौतनं शेतकरी आंदोलनावेळी केलेल्या एका वक्तव्यावर कुलविंदर कौरनं नाराजी व्यक्त केली होती. रिपोर्स्टनुसार, कुलविंदरला सस्पेंड करण्यात आलं आहे आणि तिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

या घटनेनंतर कंगना रणौतनं आधीचं ट्विटर आणि आताच्या X अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत संपूर्ण प्रकरण सांगितलं होतं. आता ती सुरक्षित आहे, पण जो आतंकवाद आणि उग्रवाद पंजाबमध्ये वाढतोय. त्याला कसं नियंत्रणात आणावं यावर तिनं प्रश्न उपस्थित केला आहे. या सगळ्या प्रकरणात आता कुलविंदर कौरच्या नावानं करण्यात आलेल्या एका कथित पोस्टचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. यात असं लिहिलं आहे की मला नोकरीची चिंता नाही, आईच्या सन्मानासाठी अशा हजारो नोकऱ्यांचा त्याग करेन- कुलविंदर कौर."

Kulwinder Kaur who Slapped Kangana Ranaut post Ready To Lose Job For Mothers Respect fact check

तर हे ट्वीट '@Kul_winderKaur' या अकाऊंटवरून करण्यात आलं आहे. त्याचाच हा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर हा स्क्रिनशॉट शेअर करत एका नेटकऱ्यानं लिहिलं की 'चंडीगढ विमानतळावर कंगना रणौतला कानशिलात लगावणाऱ्या कुलविंदर कौरचं ट्वीट आईच्या सन्मानावर अशा हजारो नोकऱ्यांचा त्याग करेन.'

अनेक लोक या पोस्टला कुलविंदर कौरची पोस्ट समजत आहेत. काही लोकांनी या पोस्टवर कमेंट करत कंगना रणौतला कानशिलात लगावल्यामुळे स्तुती करत आहेत. तर काही लोक टीका करत आहेत. दरम्यान, आजतकच्या माहितीनुसार, '@Kul_winderKaur' नावाच्या ज्या अकाऊंटवरून ही पोस्ट करण्यात आली आहे, ते कुलविंदर कौरच्या नावावर बनवण्यात आलेलं खोट अकाऊंट आहे. हे अकाऊंट आधी जम्मू कश्मीरच्या माजी राज्यपाल सत्यपाल मलिकच्या नावानं चालवण्यात येत होतं. ते अकाऊंट देखील फेक होतं. 

फेक X अकाऊंट बनवणारे लोक नेहमीत कोणत्या व्यक्तीच्या चर्चेत आल्यानंतर त्यांच्या नावानं एक फेक अकाऊंट सुरु करतात. जेणे करून त्यांच्या फॉलोवर्स वाढतील. काही दिवसांनी ते त्यांच्या अकाऊंटचं नाव बदलतात, पण अकाऊंटचा ट्विटर आयडी हा तोच राहतो. ट्विटर आयडी हा एक प्रकारचा यूनीक नंबर आहे. जो प्रत्येक अकाऊंटसाठी वेगवेगळा असतो. त्यामुळे ते पकडले जातात. 

हेही वाचा : कंगना रणौतला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला मिळणार 1 लाखांचं बक्षीस? उद्योजकानं केली घोषणा

दरम्यान, एबीपी न्यूजच्या माहितीनुसार, कुलविंदर कौरचा भाऊ आणि शेतकऱ्यांचा नेता शेर सिंहनं सांगितलं की 'माझी बहीण ऐकलेल्या गोष्टीवर भावनात्म रुपात चिडली असेल. शेतकरी आणि जवान हे दोन महत्त्वाचे आहेत. आम्ही या प्रकरणात तिचे पूर्णपणे समर्थन करत आहोत.'