अभिनेत्री श्रद्धा आर्याच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

श्रद्धा आर्या ही टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

Updated: Aug 29, 2022, 10:30 PM IST
अभिनेत्री श्रद्धा आर्याच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती title=

मुंबई : श्रद्धा आर्या ही टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. लोकांना श्रद्धा खूप आवडते. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी दररोज मजेदार व्हिडिओ आणि रील शेअर करत असते. आता नुकताच श्रद्धाने तिच्या इंस्टाग्रामवर असा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून तुम्हीही उत्साहित व्हाल आणि अभिनेत्रीला पाहून अभिनंदन करण्याचा विचार कराल. पण पुढच्याच क्षणी श्रद्धा असं काही करते जे पाहून तुम्हाला हसू येईल. 

श्रद्धा देणार गोड बातमी?
अभिनेत्रीने इन्स्टावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिचा बेबी बंप दिसत आहे आणि ती तिच्या बेबी बंपला प्रेमाने पाहत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री आरशासमोर उभी राहून तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. पण नंतर श्रद्धा तिच्या पोटावर हात मारते आणि पोट आत घेते. हे पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

खरंतर श्रद्धा गरोदर नाही, पण तिच्या पोटात ब्लोटिंग होत होतं. हा मजेदार व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने स्वतः सांगितलं आहे की, पोट फुगल्यामुळे असं झालं आहे. अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत  लिहिलं आहे की, 'मी लठ्ठ नाही, मी फुगलेली आहे'. श्रद्धाचा हा व्हिडिओ पाहून लोकांना हसू आवरता येत नाही. श्रद्धाच्या पोस्टवर काही सेलिब्रिटींनी कमेंटही केल्या आहेत.