मुंबई : बालकलाकार प्रफुल्ल भालेरावचा मृत्यू झालाय.... आज पहाटे मालाडजवळ झालेल्या रेल्वे अपघातात प्रफुल्लचा मृत्यू झालाय.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बारायण या मराठी चित्रपटात त्यानं भूमिका साकारली होती. तसंच झी मराठीच्या कुंकू आणि तू माझा सांगाती या मालिकेतनंही प्रफुल्लनं भूमिका साकारल्या होत्या.
प्रफुल्ल सध्या मालाडमधल्या एका कंपनीत काम करत होता... तिथली नाईट शिफ्ट संपवून तो पहाटे घरी जात होता. तो मालाडहून पहाटे चार बाराची चर्चगेट लोकल पकडत होता.
धावत लोकल पकडत असताना त्याचा हात सुटला आणि तो समोरच्या खांबावर आपटला, त्यातच त्याच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला.