"माणसं आपली असतात आणि नसतातही", कुशल बद्रिकेची 'ती' भावूक पोस्ट वेधतेय चाहत्यांच लक्ष

 'चला हवा येऊ द्या' च्या शोमुळे घराघरात पोहोचलेला कलाकार कुशल बद्रिके. आपल्या नाविण्यपूर्ण अभिनयाने कायमच सर्वांना आनंद देत असतो. या पोस्टला दिलेलं कॅप्शन चाहत्यांचं लक्ष वेधत आहे. 

Updated: Mar 15, 2023, 08:54 PM IST
"माणसं आपली असतात आणि नसतातही", कुशल बद्रिकेची 'ती' भावूक पोस्ट वेधतेय चाहत्यांच लक्ष title=

मुंबई : 'चला हवा येऊ द्या' च्या शोमुळे घराघरात पोहोचलेला कलाकार कुशल बद्रिके. आपल्या नाविण्यपूर्ण अभिनयाने कायमच सर्वांना आनंद देत असतो. आपण प्रेक्षकांनी कुशल बद्रिकेचा आतापर्यंत प्रवास पाहिला आहे. त्याचप्रमाणे त्याला कुटुंबियांकडून मिळणारी साथ अतिशय खंबीर आहे. कुशल आणि सुनैनाचं लव्ह मॅरेज. कुशल सोशल मीडियावरही कायम सक्रिय असतो. नेहमी तो स्वत:चे आणि त्याच्या कुटूंबीयांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकतीच कुशलने एक पोस्ट त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. जी तुफान व्हायरल होत आहे. 

या पोस्टमध्ये कुशलने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो संध्याकाळी खिडकीच्या बाहेर एकटक पाहताना दिसत आहे. या फोटोसोबत त्याने एक कॅप्शन दिलं आहे. जे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. कॅप्शनमध्ये कुशलने लिहीलंय की,  'माणसं आपली असतात आणि नसतातही,जशी ती आपली असण्याची आपल्याला सवय असते, तशीच ती आपली नसल्याची सुद्धा सवय होते हळूहळू. 

नाही म्हणजे आठवण येते त्यांची, पण आता अगदी पूर्वीसारखं आयुष्य अडत नाही त्यांच्याशिवाय, सवयीने आपण आता दोन चहा, दोन कॉफी सांगत नाही, पावभाजी वर दोन पाव ''एक्स्ट्रा'' सांगत नाही,''वन बाय टू'' चं शेअरिंग ''मॅच्युरिटीच्या बेरिंग' मध्ये हरवून गेलय कुठेतरी. 

फक्त ''आपल्याकडून माणसं जशी मागे सुटत जातात ना तसे, आपणही थोडे थोडे मागे सुटत जातो त्यांच्यासोबत''. पण तरीही एक दिवस सगळं नीट होईल ही संभावना रहातेच मनात.''राहून गेल्या हाती, संभावनांच्या वेण्या! विण गुंफता जीवाची,तू एकटा केविलवाण्या''!!सुकून... कुशलची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक कलाकारांनीही या पोस्टवर लाईक कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कुशलला 'चंद्रा' गाण्यावर डान्स करणं पडला होतं महागात
काही दिवसांपूर्वी  कुशलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो, स्किट करता-करता चंद्रा गाण्यावर नाचू लागला. यावेळी स्नेहल शिदमनंही कुशल बद्रिकेसोबत ठुमका धरला होता. मात्र पुढल्या काही क्षणात असं काही झाले की कुशलचा तोल गेला की काय.. परंतु स्टेजच्या टोकाला आल्यानंतर तो जोरात खाली पडला आणि घरंगळत जमिनीवरच आडवा झाला. काही वेळासाठी सगळेच स्तब्ध झाले. अमृता खानविलकर आणि ऋताचा चेहरा हा कावारा बावरा आणि आश्चर्यचकित झाला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.