स्मिता पाटील यांना लागली होती मृत्यूची चाहूल...

...ही होती अभिनेत्री स्मिता पाटील यांची शेवटची इच्छा  

Updated: Dec 13, 2019, 02:11 PM IST
स्मिता पाटील यांना लागली होती मृत्यूची चाहूल...

मुंबई : 'नमक हलाल', 'शक्ती' अशा एकापेक्षा एका चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या अभिनेत्री स्मिता पाटील आज फक्त चित्रपटांमध्येच जिवंत आहेत. त्यांचा कलाविश्वातील काळ अतिशय कमी राहिला आहे. पण या कमी वेळात त्यांनी स्वतःची एक वेगळीच जागा निर्माण केली. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आजही स्मिता पाटील यांचे असंख्य चाहते आहेत. प्रत्येक अभिनेत्रीसाठी स्मिता पाटील या एक आदर्श आहेत. 

१९७५ साली स्मिता पाटील यांनी 'चरणदास चोर' या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरूवात केली आणि १३ डिसेंबर १९८६ साली त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

happy birthday to my gorgeous lady

स्मिता पाटील या फक्त उत्कृष्ठ अभिनेत्रीच नव्हत्या. तर त्या उत्तम वृत्त निवेदक देखील होत्या. तसेच त्यांना उत्तम फोटोग्राफीची जाण होती.  स्मिता पाटील यांच निधन होऊन ३३ वर्षे झाली पण आजही उत्तम अभिनेत्री म्हणून त्यांच नाव घेतलं जातं.

व्हायरल इन्फेक्शनमुळे स्मिता यांना मेंदूचा संसर्ग झाला होता. प्रतीकच्या जन्मा नंतर जेव्हा त्या घरी आल्या, त्यानंतर त्या तपासणीसाठी देखील रूग्णालयात जात नसे. त्यानेहमी म्हाणायच्या मी माझ्या मुलाला सोडून कोठेही जाणार नाही. 

जेव्हा त्यांच्या शरीरात इन्फेक्शनचे प्रमाण अधिक वाढले तेव्हा त्यांना जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. प्रतीक बब्बरच्या १४ दिवसांनंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांना त्यांच्या मृत्यूची चाहूल आधिच लागली होती. मृत्यू आधिच त्यांनी मेकअपमेन दीपक सावंत यांच्याकडे आपली शेवटची इच्छा व्यक्त केली होती. मृत्यूनंतर आपल्या मृतदेहाला एखाद्या नवरीप्रमाणे सजवावं अशी त्यांची शेवटची इच्छा होती. त्यांची ही शेवटची इच्छा पूर्ण देखील करण्यात आली.