...म्हणून लता मंगेशकरांनी जनतेला केलं आवाहन

मुख्यमंत्र्यांनी जनतेला संबोधित केल्यानंतर लता मंगेशकरांनी जनतेला आवाहन केलं.     

Updated: Nov 8, 2020, 06:23 PM IST
...म्हणून लता मंगेशकरांनी जनतेला केलं आवाहन title=

मुंबई : दिवाळी आणि करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.  शिवाय सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका असं आवाहन देखील त्यांनी जनतेला केलं. सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका. प्रदुषणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतोय त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ नको म्हणून काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केल्यानंतर  गानकोकीळा लता मंगेशकर यांनी ट्विट करत जनतेला आवाहन केलं आहे.

ट्विट करत लता मंगेशकर म्हणाल्या की, 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले. त्याची अंमलबजावणी करणं खूप गरजेचं आहे, असं मला वाटतं. दिवाळीमध्ये कमी कमी फटाके फोडा. प्रदूषण थांबवा. प्रकाशाचं पर्व साजरं करा. दिवाळी साजरी करा.' असं त्या म्हणाल्या. 

शिवाय मास्क आवश्य लावा. स्वतःची आणि स्वतः कुटुंबाची आणि समाजाची काळजी घ्या,” असं आवाहन लता मंगेशकर यांनी केलं आहे. कोरोना रुग्णवाढीची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहिम अत्यंत महत्त्वाची ठरली. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे'मुळे यश लाभले. कोरोना रुग्ण कमी झाले आहेत. त्यामुळे पुढचे ६ महिने नियम पाळा. ६० हजार जणांची टीम 'माझे कुटुंब माझी जबाबदारी'वर काम करत आहे. 

त्याचबरोबर, कोरोनाविरोधात मास्क हेच शस्त्र आहे असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. घराघरात जाऊन जणतेची तपासणी होत आहे. मास्क न घातल्यास दंड वसूल करण्यात येईल. दिवाळीनंतर एक नियमावली करु. गर्दी टाळा.कोणीच अनावश्यक घराबाहेर पडू नका. ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला.