मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर आपल्यामध्ये नाहीत. रविवारी त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींची संपूर्ण काळजी घेणारे डॉ प्रतीत समदानी यांनी एक खूप खास गोष्ट सांगितली आहे. त्यांनी ही गोष्ट सांगताना लतादीदी आणि त्यांचं नातं कसं होतं हे देखील सांगितलं आहे.
डॉ प्रतीत समदानी यांच्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक पेशंट आणि डॉक्टर पलिकडे त्यांचं नातं होतं. समदानी यांच्या मुलीवर लतादीदींचा खूप जीव होता. त्या व्हिडीओ कॉल करून त्यांच्या मुलीशी गप्पा मारायच्या. समदानी आणि त्यांचा खूप चांगला घरोबा होता.
लतादीदींची संपूर्ण काळजी समदानी आणि त्यांच्या टीमने घेतली. यावेळी ते सांगायचे जेव्हा लतादीदी एक स्मितहास्य करायच्या तेव्हा खूप छान वाटायचं. दीदींबद्दल बोलताना समदानी म्हणाले, त्यांना आम्ही विचारायचो दीदी आता तुम्हाला कसं वाटतं? तेव्हा दीदी फक्त हसायच्या.
दीदीचं ते हसणं आमच्यासाठी लाखमोलाचं होतं. याचं कारण लतादीदी हसल्या म्हणजे सगळं काही ठिक आहे. त्यांना बरं वाटतं आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचं हे हास्य आमच्यासाठी कित्येक मिलियन डॉलर्सपेक्षा मोलाचं होतं.
शेवटच्या क्षणी दीदी ICU मध्ये होत्या तेव्हा जास्त त्या काहीच बोलू शकल्या नाहीत. मात्र त्यांच्यासारखं प्रेमळ मिळणं खूप कठीण आहे. त्यांचं आणि आमच्या कुटुंबाचं नातंच खूप वेगळं होतं असंही डॉक्टर समदानी यांनी माहिती दिली आहे.