ट्रेलरनंतर आता 'सिंघम अगेन' चित्रपटातील पहिले गाणे रिलीज, गाणं पाहून चाहते म्हणाले, जय बजरंगबली

'सिंघम अगेन'चे पहिले गाणे 'जय बजरंगबली' रिलीज झाले आहे. हनुमान चालिसाने प्रेरित हे गाणे श्रोत्यांना उत्साहाने भरून जात आहे. म्युझिक व्हिडीओवर 'जय बजरंगबली' लिहून तो आपला उत्साह व्यक्त करत आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 20, 2024, 12:34 PM IST
ट्रेलरनंतर आता 'सिंघम अगेन' चित्रपटातील पहिले गाणे रिलीज, गाणं पाहून चाहते म्हणाले, जय बजरंगबली

Singham Again : अजय देवगनचा आगामी चित्रपट 'सिंघम अगेन' च्या निर्मात्यांनी नुकतेच या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज केले आहे. या चित्रपटात अजय देवगनसह रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ सारखे कलाकार आहेत. 'सिंघम अगेन' चित्रपटातील पहिलं गाणं 'जय बजरंगबली' चित्रपटातील अध्यात्म आणि उर्जेची अनुभूती देते. 

Add Zee News as a Preferred Source

हनुमान चालिसाने प्रेरित असलेला हा सशक्त ट्रॅक सणाच्या हंगामासाठी योग्य साऊंडट्रॅक आहे. सुधांशू, रितेश जी राव, सात्विक जी राव, पृथ्वी चंद्रा, लक्ष्मी नायडू, श्रुती रंजनी, प्रणती, ऐश्वर्या दारुदी, साहित्य चगंटी, मनीषा पांडरंकी, श्रुतिका, लक्ष्मी मेघना, नादप्रिया या गायकांनी जय बजरंगबली गाण्याला आपला आवाज दिला आहे. हे गाणे थमन एस यांनी संगीतबद्ध केलं आहे. गाण्याचे गीत स्वानंद किरकिरे यांनी लिहिले आहे. दमदार ट्रॅक, भक्तिभावना मिश्रित हे गाणं आहे. चित्रपटाच्या अॅक्शन-पॅक सीन्ससाठी योग्य स्टेज सेट करतो. 

या दिवशी होणार प्रदर्शित 

'सिंघम अगेन' चित्रपटाचा ट्रेलर 7 ऑक्टोबर रोजी रिलीज झाला आहे. जिथे त्याच्या विलक्षण कथेची झलक पाहायला मिळत आहे. सिंघमच्या या भागात, निर्भय बाजीराव सिंघम आपल्या टीमसह पत्नी अवनीला वाचवण्याच्या मोहिमेवर निघतो. 'सिंघम अगेन' हा चित्रपट हिंदू महाकाव्य रामायणापासून प्रेरित आहे. चित्रपटात लोकप्रिय पात्रे ही आधुनिक शैलीत मांडली आहेत. अजय देवगन हा भगवान राम यांच्या भूमिकेत आहे. तर टायगर श्रॉफ हा लक्ष्मणच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग भगवान हनुमानाची भूमिका साकारत आहे तर अक्षय कुमार जटायूची भूमिका साकारत आहे. 

'सिंघम अगेन' हा लोकप्रिय कॉप युनिव्हर्स चित्रपट 1 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला देखील सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या 24 तासांत हा ट्रेलर 138 दशलक्ष वेळा प्रेक्षकांनी पाहिला आहे. आता नुकतेच या चित्रपटातील गाणे रिलीज झाले आहे. 

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More