मराठी चित्रपटाच्या शूटींगदरम्यान लाठीचार्ज; पाहा नेमकं काय घडलं

समोर आलेल्या माहितीनुसार एका मराठी सिनेमाच्या सेटवर लाठीचार्ज झाला आहे. नेमकं हे सगळं प्रकारण आहे तरी काय जाणून घेवूया.

Updated: Feb 8, 2024, 08:09 PM IST
मराठी चित्रपटाच्या शूटींगदरम्यान लाठीचार्ज; पाहा नेमकं काय घडलं title=

मुंबई : सध्या अनेक मराठी सिनेमा एका पाठोपाठ एक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर अनेक सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच झिम्मा २ हा सिनेमा खूप गाजला तर याच्या पाठापाठ रिलीज झालेला पंचक, ओले आले हे सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप ह मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार एका मराठी सिनेमाच्या सेटवर लाठीचार्ज झाला आहे. नेमकं हे सगळं प्रकारण आहे तरी काय जाणून घेवूया.

अंतरवाली सराटी येथे या सिनेमाचं शूटींग सुरु आहे. आज पुन्हा एकदा ईथे लाठीचार्ज होताना दिसत आहे , पण हा लाठीचार्ज खरा नसून मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर तयार होत असलेला "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" या चित्रपटातील एक सीन आहे , हा चित्रपट २६ एप्रिल २०२४  ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे , हा चित्रपट गोवर्धन दोलताडे निर्मित आणि शिवाजी दोलताडे दिग्दर्शित असून मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत अभिनेता रोहन पाटील दिसणार आहे.

मराठा आंदोलनाच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील प्रचंड चर्चेत आले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर उपोषण मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली होती.  जालना जिल्ह्यातून सुरू झालेल्या मराठा आंदोलनातील केंद्रस्थानी असणारे मनोज जरांगे हे मूळचे बीड जिल्ह्यातील. गेवराई तालुक्यातील माथोरी हे त्यांचे मूळ गाव. शहागड ही त्यांची सासुरवाडी. गेल्या १२ -१५ वर्षापासून ते शहागडमध्ये राहतात. माथोरी गावातील हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. 

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध 'संघर्षयोद्धा' मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू झालं असून याप्रसंगी स्वतः मनोज जरांगे पाटील, निर्माते, दिग्दर्शक आणि टीम आवर्जून उपस्थित होती. येत्या २६ एप्रिल २०२४ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे "संघर्षयोद्धा" - मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारत असलेले रोहन पाटील, अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख हे देखील उपस्थित होते. गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे, सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद केले आहे, तर शिवाजी दोलताडे दिग्दर्शनाची जबाबदारी निभावत आहेत. चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.